संजीवनी उद्योग समूह

कोपरगांव मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी विशाल गोर्डे, सुनिल कदम तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची निवड

0 5 5 1 9 1

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल गोर्डे (पुर्व भाग), सुनिल कदम (पश्चिम भाग) तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यांत आली आहे.या निवडी होण्यासाठी भाजपाचे जिल्हा निवडणुक प्रमुख राजेंद्र गोंदकर हे अध्यक्षस्थानी होते. कोपरगाव भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.तसेच मावळते अध्यक्ष कैलास राहणे, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांचा सत्कार केला. प्रारंभी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, भारतीय जनता पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष असुन कोपरगांव शहरासह तालुक्यात या पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्यांसाठी नवनिर्वाचित पदाधिका-यांनी जोमाने काम करावे, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासुन भारतीय जनता पक्षाला संघटनशक्तीच्या जोरावर सर्वोच्चस्थानी नेले आहे. त्यांच्या मन की बात मधुन ते सर्वच घटकांच्या प्रगतीचा उहापोह करून युवाशक्तीला दिशा देण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हात बळकट करून शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व प्राथमिक सदस्य, बुथप्रमुखासह सर्वच भाजप घटकांनी काम करावे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी या मतदार संघात कार्यकत्यांचे जाळे घट्ट विणलेले आहे. माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनीही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमांतुन महिलाशक्तीसह तालुक्यातील विविध घटकांना एकत्रीत करून त्यांच्या विकासात योगदान दिलेले आहे.नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे व सुनिल कदम सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, युवानेते व राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून सदस्यांची वीण अधिक मजबुत करून

जाहिरात
जाहिरात

येणा-या प्रत्येक निवडणुकीत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवुन विजयश्री खेचुन आणू. शहराध्यक्ष वैभव आढाव म्हणाले की, येणारा पुढचा काळ संघर्षांचा आहे. भारतीय जनता पक्ष या ताकदीच्या बळावर बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे जेथे जेथे सहकार्य लागेल ते घेवुन काम करू.प्रारंभी विक्रम पाचोरे यांनी प्रास्तविक केले. सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी केले तर बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.या प्रसंगी सर्व राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब नरोडे, विजय आढाव, प्रदिप नवले, नारायण अग्रवाल, दादासाहेब नाईकवाडे, सिध्दार्थ साठे, रविंद्र लचुरे, खालीलभाई कुरेशी, सतिष रानोडे, आण्णा खरोटे, हुसेन सय्यद, रोहित कनगरे, हाजी फकीरमहंमद पहिलवान, आबा नरोडे, चंद्रकांत वाघमारे, श्रीकांत नरोडे, कैलास सोमासे, रवींद्र देवडे, सुजल चंदनशिव, भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, प्रकाश गोरडे, प्रकाश दवंगे, मनोज इंगळे, वैभव कुलकर्णी, राजेंद्र बडे, सोपान चिने, रामदास शिंदे, उत्तम कदम, पोपट बोर्डे, कचेश्वर माळी,यमनाथ ठाणगे, जगन्नाथ भारती, नितीन सावंत, बाळासाहेब पाचोरे गणेश थोरात, सुधीर वाकचौरे, सतीश निकम, प्रशांत टेके, दिनेश निकम, जयराम सांगळे, हेमंत धोत्रे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 1 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे