विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त माहेगाव देशमुख येथे दिव्यांग बांधवांना पाणी जार वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सामाजिक भावनेने प्रेरित होऊन दिव्यांग बांधवांसाठी पाण्याच्या जार वाटपाचा उपक्रम प्रथम लोकनियुक्त मा.सरपंच बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आला.दिव्यांग बांधवांना शुद्ध पाण्याच्या जारचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनात छोटासा पण मोलाचा हातभार लावण्याचा प्रयत्न यामुळे झाला आहे. समाजातील दुर्बल घटकांबद्दल आपुलकी व सहकार्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.या प्रसंगी सर्वांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्या निर्णयाचे मनापासून कौतुक केले व सामाजिक जाणीवेतून साजऱ्या झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान साहेब,

बाळासाहेब पानगव्हाणे, माजी संचालक दत्तात्रय पानगव्हाणे, माजी व्हाईस सोपानराव पानगव्हाणे, वसंतराव पानगव्हाणे, एकनाथराव पानगव्हाणे, उत्तमराव पानगव्हाणे, अशोकराव पानगव्हाणे, पी. आर. काळे साहेब, संतोष जाधव, विजय कदम, मारुती कदम, नितीन कदम, विजयराव पानगव्हाणे, प्रवीण पानगव्हाणे, सतीश पानगव्हाणे, रवींद्र पानगव्हाणे, राहुल पानगव्हाणे, उमेशराव पानगव्हाणे, विकास पानगव्हाणे, विलास जाधव, शशिकांत पानगव्हाणे, नामदेव पानगव्हाणे, रमेश भगुरे, वारोबा रोकडे, दिलीप पानगव्हाणे, आदेश पानगव्हाणे, अक्षय पानगव्हाणे, रमेश पानगव्हाणे, आप्पासाहेब पानगव्हाणे, दादासाहेब पानगव्हाणे, भास्कर पानगव्हाणे, बाळासाहेब काळे, विलास काळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवा हाच धर्म या भावनेने दिव्यांग बांधवांचे मोठे काम कोल्हे परिवार सातत्याने करत आहे. हजारो दिव्यांग बांधवांना आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार नेहमी सेवाव्रत असल्याने हा उपक्रम आदर्श शुभेच्छा ठरला आहे.