संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या दहा अभियंत्यांची डेलॉइट कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिं ग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने डेलॉइट या लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधिंनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील एकुण दहा नवोदित अभियंत्यांना चांगले वार्षिक पॅकेज देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्दतेमुळे अनेकांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्णत्वास जात आहे, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की डेलॉइट कंपनीने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सौरव संजय डोंगरे, प्रतिक सचिन जाधव, श्रध्दा कैलास जेजुरकर, साईप्रसाद भरत मोरे, यश संजय मुसमाडे, अथर्व हेमंत पुरी, प्रदिप राजेंद्र वरखडे, संस्कृती विनायक जावळे, श्रुती लक्ष्मण खडांगळे व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या तृप्ती शिवाजी मगर यांची नोकरीसाठी निवड केली आहे.ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व संबधित अभियांत्रिकी शाखेचा विभाग यांच्या परस्पर पुरक समन्वयातुन कोणत्या कंपनीला कोणत्या प्रकारचे विद्यार्थ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञान अपेक्षित आहे, याचा साकल्याने अभ्यास केला जातो व त्या तंत्रज्ञानाचा एकतर अभ्यासक्रमात समावेश केला जातो किंवा अधिकचे शिकविल्या जाते.

तसेच मुलाखतींचा सराव करून घेतला जातो. या सर्व बाबींमुळे संजीवनीचे विद्यार्थी वेगवेगळ्याा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सहज निवडले जातात आणि आई वडीलांनी जे स्वप्न डोळ्यात साठवुन ठेवेलेले असते, ते सहज पुर्ण हेोत, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.