आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

गौतम पब्लिक स्कूल मध्ये कर्मवीर शंकररावजी काळे यांची जयंती उत्साहात साजरी

0 5 3 7 0 0

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. मा.खा.कर्मवीर शंकरराव काळे यांची यांची १०४ वी जयंती गौतम पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य नूर शेख व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहीली.यावेळी प्राचार्य नूर शेख यांनी स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या कार्याची आठवण करून देतांना सांगितले की, स्वर्गीय शंकरराव काळे साहेब आपल्या उत्तुंग कर्तृत्वातून सह्याद्रीची उंची गाठलेले आगळ वेगळ व्यक्तिमत्व होत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साहेबांनी आपल्या प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर जिल्हा परिषद प्रथम अध्यक्ष, लोकसभा सदस्य ते राज्याचे राज्यशिक्षण मंत्री पदापर्यंतचा केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

जाहिरात
जाहिरात

रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात त्यांचा मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं. आपण या समाजच काही तरी देनं लागतो ही भावना शेवटच्या श्वासापर्यंत जपली. ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक सुरु केले. एज्युकेशन सोसायटीच्याच्या अंतर्गत असणा-या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय सुरु करताना या शिक्षणाचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना कसा होईल हा एकमेव दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपलं आयुष्य समाज उद्धारासाठी त्यांनी खर्ची घातल असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले. यावेळी गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी रमेश पटारे, रेखा जाधव व उत्तम सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिर पठाण यांनी केले तर प्रकाश भुजबळ यांनी आभार मानले. यावेळी हेड क्लर्क केशव दळवी, रमेश पटारे, पर्यवेक्षक राजेंद्र आढाव सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे