संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

स्व.शंकरराव कोल्हे हे ज्ञानाचे आणि विचारांचे विद्यापीठ होते-सुमित कोल्हे

0 5 3 6 8 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील येसगांव येथे न्यु इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना सुमित कोल्हे म्हणाले की स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी पुणे विद्यापीठातुन १९५० साली बी.एस.सी.ॲग्री ही पदवी संपादन केली आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. तेथे नोकरीच्या मोहात न पडता मायदेशी येवुन समाजासाठी कार्य करीत राहीले.

जाहिरात
जाहिरात

त्यांच्या एकुण जीवन प्रवासा वरून व त्यांनी केलेल्या कार्यातुन स्व शंकररावजी कोल्हे हे ज्ञानाचे आणि विचारांचे विद्यापीठ होते,असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले.येसगाव येथिल न्यु इंग्लिश स्कूलच्या वतीने स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या तुतिय पुण्यस्मरण ते जयंती निमित्ताने आठवडाभर व्याखाण मालेचे आयोजन केले आहे.या मालेचे पुष्प गुंफताना सुमित कोल्हे विद्यार्थांन समोर बोलत होते. या प्रसंगी येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे,स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब निकोले, किरण गायकवाड, अमोल झावरे, कपिल सुराळकर, उत्तम पाईक, अतुल सुराळकर, सतिष गोसावी, ग्रामस्थ, मुख्याद्यापक रंगनाथ ठाकरे, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कोल्हे पुढे म्हणाले की स्व.कोल्हे उच्च शिक्षित होते. परंतु आपण सर्व सामान्यातील वाटावे यासाठी त्यांनी कायमचा धोतर,शर्ट व टोपी असा पेहराव स्वीकारला. त्यांनी सहकार समजुन घेण्यासाठी एका कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणुन काम केले व नंतर संजीवनी कारखाना काढला. त्यांनी शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन त्यांच्यासाठी अनेक आंदालने केली व मोठ्या राजकिय त्यागाला सामोरे गेले.

जाहिरात
जाहिरात

येसगावची शाळा आणि स्व. कोल्हे यांच्यात अनोखे नाते होते. १०७१ साली येसगांवची शाळा एका मंदीरात सुरू झाली होती आज तिची वाटचाल भव्य इमारतीत झाली असुन सर्व सोयी येथे आहेत. स्व कोल्हे यांनी स्वतःच्या आचरणातुन संपर्कातील व्यक्तींना चांगले संस्कार दिले.ते वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. जीवनात व्यायामाचे महत्व त्यांनी शेवट पर्यंत जपले. ते सतत वाचन करीत असे व नवीन पिढीला त्यातुन माहिती देत.प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आजार पणावर देखील मात केली असे सुमित कोल्हे शेवटी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
18:46