प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी निवड
अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला सभापती पदाचा मान

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विधान परिषदेच्या सभापती पदी भाजपाचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली असून आज एक मताने विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला यानंतर सभागृहातील उपस्थित सर्वांनी राम शिंदे यांच्या नावाला होकार दिला यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांची एक मताने निवड झाल्याची घोषणा केली आज विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर आमदार श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करावी असा सर्वांसमोर प्रस्ताव मांडला यावर मनीषा कायंदे आणि अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहा समोर ठेवला याप्रसंगी सत्ताधारी आणि विरोधकांनी प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड केली त्यानंतर उपसभापती नीलम गोरे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल सभागृहामध्ये अभिनंदन प्रस्ताव मांडला त्यावर सभागृहातील सर्व आमदारांनी त्याला अनुमोदन दिले अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्याला सभापती पदाचा मान आज मिळाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपसभापती नीलिमा गोरे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांना सभापती पदाच्या खुर्चीवर नेऊन बसवले.