पिण्याच्या पाण्याच्या आर्वतनातुन गणेश व कोपरगांव परिसरातील बंधारे भरून द्या-विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गेले दोन महिन्यांपासुन कोपरगांव तालुका व राहता तालुक्यातील गणेश परिसरात पावसांने ओढ दिलेली आहे.अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. शेतक-यांकडील असलेले पशुधन जगवावे कसे अशी चिंता असुन नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सध्या पिण्यांच्या पाण्यांचे आर्वतन सुरू असुन त्यातुन कोपरगांव व गणेश परिसरातील दगडी साठवण बंधारे, पाझरतलाव, मातीचे बंधारे भरून द्यावे अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. श्री गणेश कारखाना चेअरमन सुधीर लहारे,व्हा.चेअरमन विजय दंडवते,सर्व संचालक मंडळ,महेंद्र शेळके,धनंजय गाडेकर,शिवाजीराव लहारे,संजय शेळके,दादासाहेब सांबारे,सुधाकर जाधव, धनंजय जाधव,अनिल बोठे,नितीन सदाफळ, भाऊसाहेब थेटे,सुरेश गमे,लक्ष्मण डांगे,चंद्रभान धनवटे,संजय सरोदे,चंद्रभान गुंजाळ व गणेश परिसरातील शेतकरी बांधव यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना गणेश बंधारे भरून मिळावे यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती.त्यास सकारात्मक प्रतिसाद देत विवेकभैय्या कोल्हे यांनी तातडीने पाठपुरावा केला आहे.विवेकभैय्या कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, चालु पावसाळी हंगामात जुन जुलै दोन महिने उलटुनही अद्यापही कोपरगांव तालुका व गणेश परिसरात पर्जन्यमान झालेले नाही. सध्या घोटी ईगतपुरी नाशिक परिसरात पाउस आहे त्या पाण्यांचा विसर्ग दारणेसह अन्य धरणांतुन गोदावरी नदीपात्रात दररोज मोठया प्रमाणांत सोडला जात आहे. गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी नसल्यांने आसपासच्या परिसरातील विहीरींनी तळ गाठला आहे, ग्रामिण भागात नागरिकांबरोबरच शेतक-यांकडील पशुधनाला पिण्यांच्या पाण्याची चिंता आहे, पाउस नसल्यांने हिरवे गवत चारा देखील उपलब्ध नाही त्यामुळे अन्य ठिकाणाहुन हिरवा चारा व पिण्यांच्या पाण्यासाठी खाजगी टँकरद्वारे शेतक-यांना पाणी विकत घेवुन जनावरे जगवावी लागत आहे सध्या गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांचे आर्वतन सुरू आहे, त्या पाण्यांतुन कोपरगांव तालुका व गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील दगडी साठवण बंधारे, पाझरतलाव मातीचे बंधारे भरून द्यावे अशी मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी शेवटी केली आहे.