संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची राजविका कोल्हे, संजीवनी अकॅडमीचे सर्वेश शेळके व स्पंदन जाधव हे राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत गोल्ड मेडलचे मानकरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीची राजविका अमित कोल्हे, संजीवनी अकॅडमी, कोपरगांवचे सर्वेश तुशार शेळके व स्पंदन प्रकाश जाधव यांनी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजीत, महाराष्ट्र स्टेट स्पोर्टस् कौन्सिल, पुणे व महाराष्ट्र स्टेट सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने वगवेगळ्या वयोगटांच्या सॉफ्टबॉलच्या टीम्सचे नेतृत्व करीत राष्ट्रीय स्पर्धेत तिघांनीही गोल्ड मेडल मिळवुन संजीवनीच्या क्रीडा वैभवात भर टाकली. या ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा होत्या, अशी माहिती दोनही स्कूल्सच्या वतीने संयुक्तिक प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की राजविका कोल्हे हिने १४ वर्षे आतिल मुलींच्या संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे झाल्या. तिच्या संघाने उपान्त्य फेरीत राजस्थान संघाविरूध्द १-० गुणांनी विजय मिळविला व अंतिम सामन्यात छत्तिसगड संघाविरूध्द उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत २-० गुणांनी विजय मिळवित गोल्ड मेडल मिळविले. सर्वेश शेळके यांने १४ वर्षे आतिल मुलांच्या संघाचे नेतृत्व केले. त्याच्या संघाने उपान्त्य फेरीत चंदीगड संघामध्ये व अंतिम फेरीतही दिल्ली संघाविरूध्द २-० गुणांनी दणदणीत विजय मिळवुन गोल्ड मेडल मिळविले.

या दोनही स्पर्धा छ. संभाजीनगर येथे झाल्या. जळगाव येथे झालेल्या १७ वर्षे आतिल राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत स्पंदन जाधवने नेतृत्व करीत उपान्त्य फेरीत छतिसगड संघाविरूध्द १-० व अंतिम फेरीत पंजाब संघाविरूध्द २-० गुणांनी विजय मिळवुन गोल्ड मेडल मिळविले. राजविका, सर्वेश व स्पंदन या तिघांनीही महाराष्ट्राच्या संघांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्रा बरोबरच आपल्या शाळांचेही नावे उज्वल केले.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ.मनाली कोल्हे यांनी तिघांचे तसेच त्यांचे कोच विरूपक्ष रेेड्डी यांचे अभिनंदन केले.