संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच अभियंत्यांची अंबर एन्टरप्रायझेस कंपनीत नोकरीसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग नामांकित कंपन्यांशी संपर्क साधुन नवोदित अभियंत्यांना नोकऱ्या Úया मिळवुन देण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून त्यांना शेवटच्या सत्रातच नोकरी मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल असतो. अशाच प्रयत्नांतुन अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड या सर्व प्रकारचे वातानुकूलीत संयत्रे बनविणाऱ्या कंपनीने महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अंतिम संत्रातील पाच अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. याचबरोबर कंपनीने या पाचही अभियंत्यांना निकालापूर्वीच स्टायपेंड (ठारविक पगार) देवु करून इंटर्नशिपसाठीही परवानगी दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या माहिती आणि प्रसारण विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते की माझ्या मुलाने किंवा मुलीने शिक्षण पुर्ण केल्यावर नोकरी अथवा काहीतरी व्यवसाय करून स्वावलंबी झाले पाहीजे. अशीच इच्छा माझ्या पालंकांची होते. परंतु यासाठी शाश्वत शिक्षण देणारी संस्था व संस्थेच्याच पुढाकारने नोकरी मिळाली पाहीजे, या विचारधारेतुन माझ्या पालकांनी पुर्व अनुभवावरून व संजीवनीच्या नावलौकिकावरून संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची माझ्या शिक्षणासाठी निवड केली व मला मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये प्रवेश दिला. माझ्या कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्याने मला अद्ययावत तंत्रज्ञान शिकायला मिळाले. टी अँड पी विभागाने मुलाखतीची तयारी करून घेतली आणि माझी सहजरित्या अंबर एंटरप्रायझेस कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली. आमच्या ऑटोनॉमस कॉलेजच्या पॅटर्ननुसार आम्हाला एखाद्याा कंपनीत शेवटच्या सत्रात इंटर्नशिप (आंतरवासिता) करावी लागते. सहसा कंपन्या इंटर्नशिप देण्यास धजावत नसतात कारण त्यांचे दैनंदिन कामात व्यत्यय येतो. परंतु माझी निवड केलेल्या कंपनीने मला स्टायपेंड देवुन इंटर्नशिपची परवानगी दिली असुन सध्या मी इंटर्नशिप करीत आहे. अंतिम निकाला अगोदरच मी कमवती झाली असुन हे सर्व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमुळे शक्य झाले. संजीवनीमुळे मी आमच्या परीवारातील पहिली मुलगी नोकरदार झाली आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.-नवोदित अभियंता मुलगी ऋचिका मापारी.
पत्रकात पुढे म्हटले आहे की अंबर एंटरप्रायझेस या कपंनीने उदय अशोक ढवळे , गौरव विजय गाढवे, ऋचिका शरद मापारी, अनिकेत नानासाहेब वाघ व धनश्री साईनाथ तिपायले यांची नोकरीसाठी निवड केली आहे. हे सर्व ग्रामीण भागातील असुन संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी ४२ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील नवोदितांना रोजगार मिळवुन देण्याचे जे स्वप्न पाहीले होते, त्यानुसार संजीवनीच्या माध्यमातुन हजारो युवक युवतींनी रोजगार मिळुन वयाच्या २२ व्या वर्षी ते स्वयंपुर्ण होत आहे. अशा प्रकारे संजीवनी शैक्षणिक संकुल म्हणजे नोकरदार होण्याची फॅक्टरी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांची व त्यांच्या पालकांची संजीवनी अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.