संजीवनी उद्योग समूह

कोपरगांव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक व्हावी-भाजपाच्यावतीने तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0 5 4 0 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगांव तालुक्यातील महसुल, वन, पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, परिवहन आदि विविध विभागाच्या नागरिकांच्या हितार्थ असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक व्हावी याबाबत युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषयांकीत कामाबाबतचे निवेदन कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तहसिलदारांना देण्यांत आले त्याचा स्विकार नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते, व गटविकास अधिकारी अधिकारी दळवी यांनी केला.या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, तालुक्यात गोदावरी नदीकाठावरील गावातुन सर्रास बेकायदा वाळू उपसा होत आहे परिणामी गांव शिवार अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे, शासनाच्यावतीने जेव्हढा वाळुचा परवाना दिला त्यापेक्षा प्रचंड प्रमाणांत वाळु काढली जात आहे, मायगांवदेवी येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे तो तातडीने बंद व्हावा, नविन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड नागरिकांना मागणी प्रमाणे मिळत नाही, वेळापुर येथे स्मशानभूमी व्हावी, संवत्सर हददीत कोपरगांव औद्योगिक वसाहतीलगत गोदा नदीकाठी बेसुमार मातीचा उपसा सुरू आहे, आंचलगांव बोलकी, शिरसगांव दलित वस्ती, शहापुर ते वशा पांढरी रस्त्याचे अतिक्रमण, शिंगणापुर रेल्वे चौकी ते शिवरस्ता, जेऊर पाटोदा गांवठाण नसल्यांने गायरान जागेवर घरकुले बांधकाम, समृध्दी महामार्ग चेनेज ५१०-११२ पुलाखाली पाणी गाळ असल्यांने रस्ता बंद आहे, आपेगांव सौर उर्जा प्रकल्पास जागा, कोळगांवथडी नदीपात्रालगत शेतक-यांना केबल व पाईपलाईन टाकण्यांसाठी शंभर फुट खडक खोदाई, धामापुर सोसायटी भूखंड मोजणी, आपेगांव रेशनदुकान तिळवणीस जोडणे, तळेगांवमळे वन विभाग हददीत बिबटयांचा वावर वाढला असुन काटवन साफ सफाई, जलजीवन मिशन अंतर्गत शिंगणापुर,

जाहिरात
जाहिरात

वेळापुर, जेउरपाटोदा, नाटेगांव, शिंगणापुर, आपेगांव पाणी योजनेची कामे पुर्ण करून त्याअंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती, गोधेगांव कोळगांवथडी स्मशानभुमीस जागा, शहापुर पाण्याच्या तळयाचे लिकेज, कुंभारी लाभधारकांचा घरकुल हप्ता, रवंदे येथुन मायगांवदेवी येथे कमी दाबाने वीजपुरवठा होतो त्यासाठी नव्याने फिडर, जेउरकुंभारी शेती पंपाची वीज टिकत नाही, घारी येथे पुर्ण दाबाने वीज मिळत नाही, शिंगणापुरसाठी नविन तलाठी कार्यालय, टाकळी ते सोनारी रस्त्याचे साईड गटार, क्रॉसिंग नळया, संवत्सर ते धोत्रे रस्त्याच्या खडडयांची डागडुजी, गोधेगांव ते जंगलीपीरबाबा रस्ता, पुणतांबा चौफुली ते सडे फाटयापर्यंत साईडगटारचे काम, ब्राम्हणगांवकडे येणारा चर नाला उपसुन त्यातभराव, भोजडे जय बजरंग पाणी वापर संस्थेअंतर्गत चारी नंबर ११-२ बजरंग फाट्याची दुरूस्ती, मायगांवदेवी धामोरी भागात पाटबंधारे खात्याच्यावर्तीने बजावलेल्या थकीत पाणीपटटीच्या नोटीसा रदद व्हाव्या, जेऊरपाटोदा चांदगव्हाण हिंगणी डाउचबुद्रुक या गावांना नव्याने बससेवा सुरू करावी आदि मागण्या या निवेदनात असुन जनतेच्या हितार्थ योजनांच्या प्रलंबित कामांची तात्काळ सोडवणुक व्हावी अशी मागणी याप्रसंगी करण्यांत आली.याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गवळी, विक्रम पाचोरे, भाजपा शहराध्यक्ष दत्तात्रय काले, तालुका सरचिटणीस दिपक चौधरी, रविंद्र डहाळे यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष धारराव, अंकिता भालेराव, अजय शिंदे आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे