आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

तौलिक तेली समाज बांधवांना सर्वोतोपरी मदत देण्यास कटिबद्ध -आ.आशुतोष काळे

0 5 3 8 3 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणारे तौलिक तेली समाज बांधवांच्या सहकार्यातून उभे राहिल्लेले भव्य दिव्य स्वरुपाचे सांस्कृतिक भवन कोपरगाव शहराची शोभा वाढविणार असून श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या मंदिराचे मोठ्या स्वरुपात झालेले अभिमानास्पद आहे. आजवर तौलिक तेली समाज बांधवांनी माझ्याकडे ज्या ज्यावेळी समाजासाठी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. आजपर्यंत सर्व समाजाप्रमाणेच तौलिक तेली समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व भविष्यात देखील त्यांना लागणारी सर्व ती मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगाव येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा, सांस्कृतिक भवन उदघाटन सोहळा व राज्यव्यापी तेली समाज संवाद मेळावा आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलतांना मा. खा. रामदास तडस यांनी समाजाचे कौतुक करून कोपरगाव शहरातील समाज बांधवांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांना दिशा देण्याचे काम केले आहे. अतिशय मेहनतीने कष्ट घेऊन भव्य दिव्य स्वरुपाचे काम केले आहे यापुढे देखील समाज कोपरगाव शहरातील समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.यावेळी तेली समाजाचे राष्ट्रीय नेते सोमाभाई मोदी, प्रांतिक तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. खा. रामदास तडस, मा. आ.स्नेहलता कोल्हे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव भूषण कर्डीले, संत जगनाडे महाराजांचे चौदावे वंशज जनार्दन जगनाडे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राजेंद्र झावरे, बाळासाहेब लुटे,जगन्नाथ गाडेकर, प्रदीप कर्पे, जगदीश वैद्य, सुनिल चौधरी, नरेंद्र चौधरी, भागवत लुटे, रविंद्र कर्पे,

जाहिरात
जाहिरात

माचंद्रकांत वाव्हाळ, कचरु वेळंजकर, प्रसाद शिंदे, देविदास साळुंके, भरत साळुंके, विलास लोखंडे, आसाराम शेजूळ, दत्तात्रय सोनवणे, सिंधुताई देवकर, विद्याताई कर्पे, शाम कर्पे, कैलास चौधरी, बद्रीनाथ लोखंडे, डॉ.शत्रुघ्न उचित, योगेश व्यवहारे, दत्तात्रय महाले, प्रभाकर लुटे, जयेश बागडे, विशाल पवार, एकनाथ नागले, भगवान मिटकर, कचरु व्यवहारे, बंडू क्षीरसागर, संतोष केदार, संजय चौधरी, शशिकांत व्यवहारे, शारदा कर्पे, श्याम कर्पे, नरेंद्र चौधरी, जयश बागडे, सुनिल चौधरी, बंडु क्षिरसागर, सुधाकर कवाडे, कैलास लुटे,प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी, सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व तौलिक तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील समाज बांधवांनी व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट चे सर्व विश्वस्त यांनी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले आभार युवराज सोनवणे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे