कोपरगांव नगरपरिषदे

कोपरगाव शहरात नगरपरिषदेची आज सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सौ.रुपाली भालेराव व प्र.आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांच्या पथकाने आज शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली. सदर कारवाईमध्ये दि.२३ जानेवारी रोजी शहरातील चौदा ते पंधरा दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. यात कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास इत्यादींचा समावेश आहे.

जाहिरात
जाहिरात

तसेच दि.२४ जानेवारी रोजी शहरातील बाजारतळ येथे एका टेम्पोमध्ये प्लास्टिकची विक्री करत असल्याचे आढळले. त्यावेळी या ठिकाणी तपासणी करण्यात येऊन सदरील टेम्पोमधील सर्व बंदी असलेले कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, प्लास्टिक डिश इ. जप्त करण्यात आलेले आहे. सदर टेम्पोमध्ये जवळपास ९०-१०० किलो प्लास्टिक आढळलेले असून त्याचे मालक यांना रक्कम रू.५०००/- दंड परिषदेमार्फत ठोठावण्यात आलेला आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष अभियान घेण्याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषदांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेने दि. २३ जानेवारी रोजी शहरातील धारणगाव रोडवर व तसेच इतर भागात असणारे फळ विक्रेते, चिकन मांस विक्रेते, स्वीट मार्टस तसेच हॉटेल्स इ. वर कार्यवाही करून त्यांच्याकडून जवळपास अंदाजे ३०-३५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानादेखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे,

जाहिरात
जाहिरात

यामुळे नगरपरिषदेने प्लॅस्टिकबंदीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून शहरातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.सदर कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सौ. रुपाली भालेराव व प्र.आरोग्य निरीक्षक सुनिल आरण, मनोज लोट, रमेश घोरपडे, रविंद्र दिनकर, विजय डाके, रणधीर तांबे, योगेश कोपरे, अरुण फाजगे, पवन हाडा, सतीष साबळे, राहुल अवघडे, रविंद्र तुजारे, राजेंद्र लोंढे, अजय हाडा, संजय रीळ, सतीष निंदाणे, कवलजित लोट, शिवाजी पारधे यांनी केली.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे