कोपरगांव नगरपरिषदे
अगं ऐकला का..! पिण्याचे पाणी आज पासून १० दिवसांनी येणार म्हणतात

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी झालेला असल्या कारणाने पाटबंधारे विभागा मार्फत पाणी काटकसरीने वापरणे बाबत सूचना नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत.तेव्हा कॅनॉलव्दारे येणारे आवर्तन उशिरा सुटणार असल्यामुळे पाणी साठ्याचे नियोजन करणेकामी दि. ३० जुलै २०२४ पासून होणारा पाणी पुरवठा हा १० दिवसाआड करणेत येणार आहे.
तरी सर्व नागरीकांनी पाणी जपून वापरावे व नागरीकांनी आपल्या भागात असलेल्या विंधन विहीरीचा वापर करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा व नगरपरीषद प्रशासन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहे.याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी कोपरगावकरांना केले आहे.
0
5
3
5
4
5