कोपरगांव नगरपरिषदे

नगरपरिषदेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव वाचन संस्कृती जोपासने ही काळाची गरज आहे. वाचनाच्या व्यासंगातून जीवनात निश्चितपणे यशस्वी होता येते. वाचनातून विविध अनुभव आपल्याला मिळत असतात. लोकपरंपरा, संस्कृती,व्यक्तिमत्व यांची ओळख होते.अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोप पावल्याचं दुर्देवी चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे मोबाईलच्या दुकानात रांगा आणि दुसरीकडे ग्रंथालये वाचकांविना ओस पडत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी वाचनाचा संकल्प करावा.दिवसाला किमान दहा पानं नियमित वाचण्याची सवय अंगी रुजवावी आणि आपलं जीवन समृद्ध करावं असा कानमंत्र कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव नगरपरिषदेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी दिनकर खरे, कोपरगाव नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक अशोक ढेपले सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अशोक ढेपले यांनी मनोगतात, कोपरगावातील वाचन संस्कृतीचा आढावा घेऊन नगरपरिषद वाचनालयाने केलेल्या विविध उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी प्रतिभा साळवे, स्नेहा मोरे,उत्कर्षा मेहरखांब,सृष्टी देशमुख,अक्षय सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार राजेंद्र शेलार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना बोराडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश वैद्य,महेश थोरात, सारिका राक्षे, रेखा भांगरे यांनी प्रयत्न केले. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रंथालयाचे वाचक, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे