राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका बजवावी -राजकीय विश्लेषक यदु जोशी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी उद्योग समूह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने पत्रकार दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जेष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक यदु जोशी याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाले आहे यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. एखाद्या सत्ताधारी पक्ष जेव्हा निरंकुश असतो त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून अनेक चुका होण्याची दाट शक्यता असते त्याचे चटके राज्याला,देशाला व जनतेला बसत असतात अशा वेळी या सताधार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पत्रकारांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम बजावले पाहिजे. जनतेला न्याय देण्याची जबाबदारी पत्रकाराची असल्याचे प्रतिपादन सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष यदु जोशी हे बोलत होते.
जर्मनी मध्ये दहा हजार नोकऱ्यांची संधी निर्माण झालेली आहे. संजीवनी शिक्षण संस्था ही एक आदर्श शिक्षण संस्था आहे. संजीवनीने स्किल डेव्हलपमेंट कोर्स तसेच ग्रामपंचायत सदस्य ते आमदार- खासदार यांच्यापर्यंत प्रत्येकाला आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टीने प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. तसेच व्यवहारिक,उपयोगी, क्रियात्मक, अभ्यास सिद्ध, प्रयोगात्मक काम,आभ्यासिक पत्रकारिता कोर्स सुरू करावा अशी सूचना ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांनी याप्रसंगी मांडली.
यावेळी युवा नेते विवेक कोल्हे,जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, उद्योजक विपुल अग्रवाल, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, ए.डी अंत्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना विवेक कोल्हे म्हणाले की, पत्रकारितेचे अनेक माध्यम झालेले आहे. पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. आजची पिढी वाचन संस्कृती पासून दूर गेलेली आहे.शासनाने पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे व त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजे.तसेच शासनाने पत्रकाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ज्याप्रमाणे शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या अनुषंगाने पत्रकारांसाठी शासनाने लाडके पत्रकार अशी योजना सुरू केली पाहिजे. यानंतर ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की पत्रकाराला समाजाने जे दिले आहे. ते समाजाला आपण दिले पाहिजे हे आपले कर्तव्य असून पत्रकारिता करत असताना मेहनत केल्या शिवाय पर्याय नाही.

पत्रकार हा फक्त दिसनं गरजेचा नसून पत्रकार वाचला गेला पाहिजे. आपण आपल्या कामाबद्दल निष्ठा व विश्वासार्हता टिकवली पाहिजे. पत्रकार हा समाजासाठी खूप काही करत असतो. आपले कर्तव्य करत असतांना आपण आपला स्वाभिमान जपणे ही गरजेचे आहे. आपण आपले विचारांची स्पष्टता कायम ठेवली पाहिजे. तसेच पत्रकाराने राजकारणाकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले पाहिजे यामुळे वाचकांची व पत्रकारांची निराशा होणार नाही असेही शेवटी यदु जोशी म्हणाले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.डी अंत्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.साहेबराव दवंगे यांनी मानले.