संजीवनी उद्योग समूह

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

0 5 4 0 0 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची शिकवण, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शन घेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आधुनिक बदलांचा वेध घेत येणा-या प्रत्येक अडचणींवर मात करत उस उत्पादक सभासद शेतकरी,संचालक मंडळ, व्यवस्थापन,कामगार आदि सर्वच घटकांच्या सहकार्याने यशस्वी घौडदौड सुरू ठेवली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले. कार्यक्षेत्रात सभासद शेतक-यांनी उसाचे उत्पादन वाढवुन कारखान्याला स्वयंपुर्ण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलतांना केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रेणुकाताई कोल्हे या उभयतांच्या हस्ते विधीवत पुजेने संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.याप्रंसगी विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारासमोर खाजगीचे नविन संकट दिवसेंदिवस वाढत आहे परिणामी आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाळप हंगाम सुरू होण्याआधी कारखानदारीला अनुरूप ध्येयधोरणे शासनाने घेतली तर त्यानुसार साखर कारखानदारांना त्याचे नियोजन करता येते.अडचणींतील साखर उद्योग व बदलत्या स्पर्धांना तोंड देण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने विविध प्रकल्पांची उभारणी करत त्यातुन अनेक उपपदार्थ तयार केले, देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल उत्पादन, दैनंदिन गाळपात थेट उपग्रहाचा वापर, सहवीज निर्माती, बायोगॅसपासुन सहवीज, उपग्रहाच्या अभ्यासातुन थेट उस लागवडीपासुन ते तोडणीपर्यंतचे नियोजन, सीएनजी गॅस, पोटॅश खत, मत्स्य संवर्धन, बांबु लागवड, संजीवनी सेंद्रीय खत, ॲसिटीक ॲसिडसह ॲसिटीक अनहैड्राईड, इथाईल ॲसिटेटचे प्रकल्प सुरू करून त्यातुन लवकरच उत्पादन घेतले जाणार असुन जानेवारी २०२५ पर्यंत वाहनांसाठी लागणा-या सीएनजी गॅसचा १२ टनी प्रकल्प कार्यान्वीत करण्यांत येणार आहे.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आजवर उस भावात जिल्हयात सतत पहिल्या स्थानावर राहिलेला आहे, चालु गळीत हंगामात ७ लाख टन मे. टन उस गाळपाचे उददीष्ट ठेवले असुन आवश्यक तेथे आधुनिकीकरण तंत्रज्ञानाचा वापर,अद्यावत बॉयलर, स्टीम वापरात काटकसर, व शक्य तेथे दैनंदिन खर्चात बचतीचे धोरण संचालक मंडळासह व्यवस्थापनांने घेतले असुन त्याची सर्व तयारी पुर्ण झाली आहे.यंदा कार्यक्षेत्रात ३ लाख ५० हजार मे.टन ऊस उभा आहे आणि तेव्हढाच उस बाहेरून आणावा लागणार आहे परिणामी उस वाहतुकीसह अन्य खर्चात वाढ होईल तेंव्हा सभासद शेतक-यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला स्वयंपुर्ण करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातच कमी खर्चात कमी पाण्यांत अधीक उत्पादन देणा-या विविध उस जातींची लागवड करावी जेणेकरून त्याचा आर्थीक फायदाही शेतक-यांना मोठया प्रमाणांत होईल त्यासाठी शेतकी विभागाचे आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.संजीवनी उस संशोधन केंद्रात सुमारे ६ हजार पेक्षा अधिक उसजातींचे संशोधन करून त्याचे बेणे सभासद शेतक-यांना पुरविलेले आहे, नॅशनल फेडरेशन, राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन, सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस एस आर डी कोईमतुर या संस्थांच्या अभ्यासातुन कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक-यांच्या थेट बांधावर उस लागवडीचे तंत्र उपलब्ध करून देत शेतकी विभागाच्या सहकार्याने उत्पादन वाढ कार्यकम हाती घेतला आहे त्यात सर्वांनीच सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, भाजपाचे डॉ. शिरीष भट,माजी सभापती मच्छिंद्र टेके, शिवाजीराव वक्ते, रिपाई नेते दिपक गायकवाड माजी संचालक त्रंबकराव परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, संजय होन,राजेंद्र भाकरे, मोहनराव वाबळे, शिवाजीराव कदम, रामनाथ चिने, प्रदिप नवले, कैलास माळी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन मनेश गाडे,संचालक सर्वश्री.ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, आप्पासाहेब दवंगे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, उषाताई संजय औताडे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, रमेश घोडेराव, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, शेतकरी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, कैलास संवत्सरकर, माधवराव रांधवणे, कामगार नेते मनोहर शिंदे, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे,भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे,शहराध्यक्ष दत्तात्रय काले,वेणुनाथ बोळीज,विजय काळे, मुकुंद काळे,विक्रम पाचोरे,राजेंद्र बागुल,रविंद्र आगवण, भिमराज मोकळ, विष्णुपंत क्षीरसागर, रामदास चौधरी, बाळासाहेब नरोडे, दिलीप दारूणकर, प्रकाश भाकरे, चंद्रभान रोहोम, वाल्मीक भास्कर, पुंजाजी राउत, रावसाहेब जाधव, शिवाजीराव भगुरे, डॉ विजय काळे, डॉ. मोरे,साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विश्वासराव महाले यांनी केले तर शेवटी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीरावजी. सुतार यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे