आ.आशुतोष काळेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे व राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे राहणार उपस्थित

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) शुक्रवार (दि.२५) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.पुढील महिन्यात (दि.२०) रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार (दि.२२) ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून कोपरगाव विधानसभा मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे आ.आशुतोष काळे यांना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचवेळी आ. आशुतोष काळे यांनी शुक्रवार (दि.२५) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते.त्याप्रमाणे शुक्रवार (दि.२५) रोजी सकाळी ११.०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून अहिंसा स्तंभ, गुरुद्वारा रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसोबत जावून आ. आशुतोष काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.