आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

मतदार संघातील ०१ कोटी रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता-आ.आशुतोष काळे

0 5 3 8 3 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

मतदार संघातील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन दरबारी अविरतपणे केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघाच्या विकासाला आकार दिला आहे. विकास कामांना प्रशासकीय मंजुरी व निधीची तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नातून मतदार संघातील आ. निधीतून होणाऱ्या तब्बल ०१ कोटी रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील जेऊर पाटोदा येथील चंद्रलिला कमान ते श्रीकृष्ण नगर पाटी धारणगाव रोड पर्यंत भूमिगत गटार करणे (१० लक्ष),शहाजापूर येथील भरत ढोंमसे घर ते गणपती मंदिर देशमुख वस्ती रस्ता करणे (१० लक्ष), कुंभारी येथे कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लक्ष), दहेगांव बोलका येथील गधड रस्ता करणे (१० लक्ष),देर्डे चांदवड येथे संरक्षक भिंत बांधणे व सुशोभिकरण करणे (१० लक्ष),धारणगाव येथील इजिमा २१६ ते रघुनाथ जाधव घर ६ चारी रस्ता करणे (१५ लक्ष), नाटेगांव ते आंचलगांव रस्त्यावरील मोरे वस्ती जवळ नळ्या टाकून रस्ता करणे (१० लक्ष),येसगांव येथील ८ चारी येथील जुना रस्ता गणपती मंदिर ते दत्त मंदिर रस्ता करणे (१० लक्ष), तळेगाव मळे येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधणे (१० लक्ष), मढी बु. येथील रा.मा. ७ ते चारी नंबर ७ गवळी वस्ती ग्रामा ३० पर्यंत रस्ता करणे (५ लक्ष) या ०१ कोटीच्या विकास कामांचा समवेश आहे.मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. या संधीचा मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेतांना कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाला आकार दिला. जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी अनेक रस्त्याचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करून सातत्याने पाठपुरावा करून मतदार संघाच्या रस्ते व पुलांसाठी जवळपास ७०० कोटी निधी मिळविला. त्यामुळे निश्चितपणे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यात यशस्वी झालो. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना यामध्ये रस्ते, पाणी,आरोग्य,वीज आदी मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत असून एक लवकरच या विकास कामाच्या निविदा प्रकिया पूर्ण होऊन हि विकास कामे सुरु होतील. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे