संजीवनी उद्योग समूह

संजीवनी बचत गटाचा नवरात्रोत्सव ठरला महिला भगिणींचा हक्काचा उत्सव

0 5 4 0 0 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

नवरात्री निमित्ताने संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट आयोजित शारदीय नवरात्रौत्सव सन्मान नारीशक्तीचा अभिमान नारीशक्तीचा अन्यायाला उलथून टाकण्याची क्षमता असणारे आदी शक्तिचा हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका ताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरातील आणि परिसरातील महिलांसाठी दांडिया उत्सव साजरा करण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले होते. हजारो महिलांनी या नवरात्रोत्सवाचा आनंद घेत आपल्या दैनंदिन व्यापातून विरंगुळा म्हणून या कार्यक्रमास हजेरी लावली. शेकडो बक्षिसे, रोज लकी ड्रॉ तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत संजीवनीने दर्जेदार नवरात्रोत्सव घेत संस्कृतीचा आदर्श जपला आहे.सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे कोल्हे कुटुंब समाज हिताचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करते. कोपरगाव तहसील मैदान परिसरातील शेकडो महिला भगिनी या दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. आपल्या महिला भगिनींची सुरक्षा त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक हा खऱ्या अर्थाने कोणत्याही सण-उत्सवाचा उद्देश असायला हवा हा हेतू रोज साध्य झाला.नेहमीच संस्कृती जपण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करते.दसरा सणाच्या निमित्ताने संजीवनी युवा प्रतिष्ठान महिषासुर दहन सोहळा मोठे आकर्षण ठरणार आहे.नवरात्री निमित्ताने कोपरगाव तहसील मैदान येथे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित महिषासुर दहन करण्यात येते.उंच देखावा साकारून आकर्षक व ज्वलंत विषय निवडून हा उत्सव पार पडतो.या उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे