संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी ही व्हीजनरी इन्स्टिटयूट – सुधीर लंके

0 5 4 0 0 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईतील संस्थांप्रमाणे शिक्षण मिळावे, हा त्यांचा हेतू होता. त्यांचा हा हेतू मॅनेजींग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सफल करून दाखविला आहे. चांगले तंत्रज्ञ, अभियंते घडविणे, हा त्यांचा उद्देश आहे, त्यामुळे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला मी, व्हीजनरी इन्स्टिटयूट मानतो, असे गौरौद्गार अहमदनगर लोकमतचे निवासी संपादक श्री सुधीर लंके यांनी काढले.संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा (इंडक्शन प्रोग्राम) पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे या नात्याने सुधीर लंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजींग ट्रस्टी अमित कोल्हे होते. यावेळी मंचावर प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख जी.एन. वट्टमवार, एम.आर. गुंजाळ, जी. एन. जोर्वेकर, बी.जी. काकडे, के.पी. जाधव, आर. व्ही. भाकरे,रजिस्ट्रार नाना लोंढे उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लंके पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निकचा पहिला दिवस आहे. आपण ग्रामीण भागातून आलो आहोत, आपल्याला इंग्रजी जमत नाही, असा न्युनगंड बाळगु नका, भिती वाटू देऊ नका. आपल्या कल्पना शक्तीचा विस्तार करा, या संस्थेत तुम्हाला तुमच्या आवडी-निवडी जपता येतात. ज्यांच्या हातात कौशल्य आणि डोक्यात कल्पना आहेत, तो आजच्या जगात श्रीमंत आहे. तुमच्या बुद्धीमत्तेला चालना देण्याचे काम ही संस्था राबवित असलेल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीतून होणार आहे.चांगले तंत्रज्ञ बनून अशी वस्तू तयार करा की, एकट्याला नव्हे तर लाखो लोकांसाठी, समाजासाठी उपयोगात आली पाहिजे. जिद्द, गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करा, असा सल्लाही लंके यांनी नवागतांना दिला.अध्यक्षीय समारोपात मॅनेजींग ट्रस्टी अमित कोल्हे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने संस्थेची स्थापना केली. त्यांचे उद्दीष्ट सफल झाले असल्याचे मला वाटते. कारण येथे शिक्षण घेतलेल्या अभियंत्यांना विविध कंपन्यांमध्ये मागणी असते. उद्योगाला पुरक शिक्षण येथे दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थी चांगल्या पॅकेजच्या नोकरीला लागले आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हे संस्थेचे यश आहे. अभ्यासाबरोबरच येथे व्यक्तिमतव विकास साधला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय-धोरण ठरवून मार्गक्रमण करावे, असा सल्ला त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मिरीकर यांनी केले. यात त्यांनी पॉलिटेक्निकच्या गुणवत्तेचा चढता आलेख विद्यार्थी व पालकांसमोर ठेवला. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून शंभर टक्के विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधी विशद केल्या. या शिवाय येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कशा पद्धतीने मिळतो याची माहिती दिली. येथिल परिसरात शिस्त किती महात्वाची आहे, याचे विवेचनही त्यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले तर, प्रा. के.पी. जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विविध विभागाचे विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्याा संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे