गौतम बँक खेडलेझुंगे पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या ‘विना सहकार, नाही उद्धार’ या आदर्श विचारसरणीवर मार्गक्रमण करीत असतांना मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सर्व सलग्न सहकारी संस्था प्रगतीपथावर आहे. यामध्ये गौतम बँक देखील प्रगतीच्या दिशेने घौडदौड करीत आहे.बँकेची नवीन शाखा सुरु करण्यात आली असून कारखाना कार्यक्षेत्रातील खेडलेझुंगे व पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा गौतम बँक पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे गावात वै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.रघुनाथ महाराज खटाणे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौतम सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र ढोमसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निर्मला ढोमसे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, वै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर काळे परिवाराचे गुरूस्थान आहे. संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथ महाराज खटाणे यांची मागणी होती की, खेडलेझुंगे गावात गौतम सहकारी बँकेची शाखा सुरु करावी. हा गुरूंचा आदेश समजून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेची शाखा सुरु केली. गौतम बँक प्रतिकूल परिस्थितीतून प्रगतीची शिखरे गाठत आहे. बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी असून बँकेचा नफा वर्षागणिक वाढत चालला असून यावर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश दिला आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून कारखाना व परिसर समृद्ध केला. तोच वारसा पुढे चालवितांना मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराची फळे कारखाना कार्यक्षेत्रातील परिसराला चाखता यावी या उद्देशातून खेडलेझुंगे व पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण होवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गौतम सहकारी बँकेची शाखा सुरु केली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
याप्रंसगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक राजेंद्र घुमरे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजे भोसले, सुनील मांजरे, अशोक मवाळ, माजी संचालक सुनील शिंदे, कचरू घुमरे, रंगनाथ घोटेकर, नाशिक जि.प.सदस्य आनंदराव घोटेकर, खेडले झुंगेच्या सरपंच सौ.माया सदाफळ, केशवराव घोटेकर, रामनाथ घोटेकर, इफकोचे संचालक शिवनाथ सदाफळ, माजी सरपंच आर.आर.गीते, धोंडूभाऊ घोटेकर,भुतडा, खेडले झुंगे सोसायटीचे चेअरमन यादवराव सदाफळ, विजयराव सदाफळ, राजेंद्र गोर्डे, योगेश साबळे, दिलीप घोटेकर, ब्राम्हणवाडे सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर गोसावी,गौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे, वै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानचे विश्वस्त व भक्त मंडळ, तसेच बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे, शाखाधिकारी संजय बरसे आदी मान्यवरांसह खेडलेझुंगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.