संजीवनी अकॅडमीचा शाम गामी इ.१२ वी सीबीएसई परीक्षेत ९० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने(सीबीएसई-केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ) २०२४ मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीच्या सायन्स विभागाच्या शाम रमेशभाई गामी याने ९० टक्के गुण मिळवुन सर्वप्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. संजीवनी अकॅडमीचा इ.१२ वी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला असुन सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तिर्ण झाले आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रांजल मनोज गोलेचा याने ८८ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला. अभिषेक अजय शहाने ८६ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. रेवा प्रदिप देशपांडे व आयुष मनोज माकोनी यांनी प्रत्येकी ८४ टक्के गुण मिळवुन चौथा क्रमांक पटकाविला.

संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक गुणवत्तेसह सर्वच क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असुन आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकले पाहीजे, या हेतुने त्यांच्या शैक्षणिक क्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर कौशल्ये रूजविण्याचे कार्य अखंड चालु असते, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ.मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्या शैला झुंजारराव व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.