संजीवनी उद्योग समूह

बाजीराव सुतार यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को. ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (ऑस्कर ऑफ द इंडस्ट्रीज) पुरस्कार प्रदान

0 5 3 8 2 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगांव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीरावजी. सुतार यांना चिनी मंडी (साखर व व्यापार) या देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणा-या संस्थेने “एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को. ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज” शुगर इथेनॉल व बायो एनर्जी इंटरनॅशनल अवॉर्डस २०२५ (ऑस्कर ऑफ द इंडस्ट्रीज) पुरस्कार नवीदिल्ली येथे ३० जानेवारी २०२५ रोजी प्रदान केला त्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, व्हाईस चेअरमन राजेंद्र कोळपे व संचालक मंडळाच्यावतीने
कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला. सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील दोन कार्यकारी संचालकांची निवड करण्यांत आली त्यात बाजीरावजी. सुतार यांचा समावेश होता.देशातील व परदेशातील नामांकित साखर उद्योग सहकारी व खाजगी संस्था व त्यांचे कारखानदार, साखर उद्योग तज्ञ, शास्त्रज्ञ, व्यापारी या घटकाशी जोडल्या जाणा-या संशोधन संस्था व संबंधीत घटक इत्यादींचा समावेश असणा-या घटकांची आंतरराष्ट्रीय परिषद नवीदिल्ली येथे नुकतीच आयोजित करण्यांत आली होती त्याचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यात बॉलीवुड ऍक्ट्रेस हीना खान यांच्या हस्ते बाजीराव सुतार यांना पुरस्कार प्रदान करण्यांत आला.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या सत्कार समारंभात उत्तर देतांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले की, सदरचा पुरस्कार हा मी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांना समर्पित करतो.तसेच आजवर गेल्या ३९ वर्षापासुन सहकारात काम करतांना आपल्याला सहकार भूषण पुरस्कार २०१३, तसेच वारणा कारखान्यांत काम करतांना उत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार, तसेच इंदापुर कारखान्यांत काम करीत असतांना देशातील सर्वोच्च साखर निर्यातीचा २०१९ पुरस्कार प्राप्त झाले,

जाहिरात
जाहिरात

तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काम करतांना माजीमंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेमुळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. बिपीनदादा कोल्हे, कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे व विद्यमान चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांचे मार्ग दर्शनातुन उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार २०२१,बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर फॅक्टरी इन इंडिया २०२२,नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपुर यांच्यावतीने उत्कृष्ट नाविन्य पुर्ण कारखाना २०२३,व सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे २०२४ हे पुरस्कार कारखान्यांस मिळाले असल्याचे बाजीराव सुतार यांनी सांगितले वरील पुरस्कार हा देशातील सर्व सहकारी साखर कारखानदारी तुन निवडक कार्यकारी संचालकांना देत असतांना महाराष्ट्र राज्यातुन दोन कार्यकारी संचालकांची निवड करून त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांना एक्सलंन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को. ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज इन इंडिया पुरस्कार मिळाला ही बाब आपणा सर्वांना गौरवास्पद आहे असे मत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी,कामगार आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे