संजीवनी इंग्लिश मिडीयम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.संघर्षगाथा ही महिलांच्या जीवनावर आधारीत थीम यावेळी ठेवण्यात आली होती.पौराणिक ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंत महिलांच्या जीवनातील संघर्ष आणि भरारी विविध सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जि. प. मा.सदस्य अमृताताई पवार, संस्थेचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे,संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे,शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे आदींसह पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिशय दर्जेदार शिक्षण संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिले जाते. उत्तम व्यवस्थापन आणि कौटुंबिक जिव्हाळ्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे ज्ञानमंदिर आहे.रेणुकाताई कोल्हे यांनी अतिशय प्रभावीपणे शाळेचे नावलौकिक वाढविले असून एक प्रकारे या संस्थेची माय म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे अमृताताई पवार म्हणाल्या.विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळविलेल्या गुणवंतांचा सन्मान यावेळी करण्यात आला व उत्कृष्ट सादरीकरणाने हा सोहळा संपन्न झाला.संस्थेच्या जडणघडणीचा संपूर्ण घोषवारा व प्रगती रेणुकाताई कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना व्यक्त केला व भविष्यातील उपक्रमांची मांडणी केली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मातृसंस्था असणाऱ्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी सेहचाळीस वर्षापूर्वी केली होती.

संस्थेच्या प्रगतीत बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली.सात वर्षापूर्वी शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे यांनी स्वीकारली. शैक्षणिक प्रवाहात त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक बदलामुळे शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत अतिशय चांगल्या उंचीवर पोहचत शंभर टक्के निकालाची उत्कृष्ट परंपरा जपली जाते आहे असे कौतुक मान्यवरांनी केले.या कार्यक्रमाचे सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मोहसीन शेख सर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र कोळपे ,संचालक बाळासाहेब वक्ते,रमेश घोडेराव,संजयराव होन,सौ.मोनिकाताई संधान, माजी सभापती वैशालीताई साळुंखे आदीसह पालक,विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.