Breaking
संजीवनी उद्योग समूह

तळेगाव मळेमध्ये कोल्हे कुटुंबावर विश्वास दाखवत अनेकांची काळे गटाला सोडचिठ्ठी

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार काळे यांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीला कंटाळून कोल्हे कुटुंबावर विश्वास दाखवत प्रवेश झाले आहे.यामध्ये मनोज काजळे, रामेश्वर काजळे, संजय टुपके, विष्णू शिंदे, कैलास टुपके, सुरेश जाधव, सोन्याबापू टुपके, दादासाहेब शेटे, ज्ञानदेव टुपके, रामनाथ साबळे, बंटी आभाळे, विलास शिंदे, रमेश गांगुर्डे, प्रकाश टुपके, रमेश टुपके, संजय टुपके, खुशालचंद आभाळे, शिवाजी जाधव आदीसह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

आशुतोष काळे यांच्या निष्क्रिय कारभाराला तळेगाव मळेच्या ग्रामस्थांनी शिक्कामार्फत करत काळे यांचे निष्क्रियतेचे प्रमाणपत्र या प्रवेशाने दिले आहे.

विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्वांचे भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत केले आणि मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आशुतोष काळे यांच्याकडून अपेक्षित कामे होत नाही.केवळ सत्तेवर येण्यापर्यंतच आश्वासनांची खैरात झाली मात्र प्रत्यक्षात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न बिकट होण्याला कारभारात नसलेलेली सुसूत्रता जबाबदार आहे.ग्रामीण भागातील जनतेचे दैनंदिन कामे होण्यास अडचण असून अधिकाऱ्यांवर वचक लोकप्रतनिधीचा नाही.भरमसाट टक्केवारी आणि निकृष्ट कामे यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

जाहिरात

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत या कारभाराला जनमताने उत्तर देऊ असा विश्वास सर्वांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी कोल्हे कारखाना संचालक त्र्यंबकराव सरोदे, नारायणराव टुपके, दादा अप्पा टुपके, तुकाराम जाधव, वाल्मिकराव पिंपळे, साई संजीवनी बँकेचे संचालक सुरेश जाधव,वसंतराव कदम, धोत्रे सरपंच प्रदीप चव्हाण, किरण चव्हाण, भाऊसाहेब गागरे, मंजाहरी वैद्य, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष विशाल गोर्डे, युवा मोर्चा अध्यक्ष सतीश देवकर, गोरख पाटील, सरपंच दत्तात्रय टुपके, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, बाळासाहेब टुपके, ज्ञानदेव टुपके, आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »