Breaking
संजीवनी उद्योग समूह

कोपरगावमध्ये रंगणार वाजवेल तो गाजवेल भव्य ढोल ताशा स्पर्धा 

संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित ढोल ताशा स्पर्धा

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे कोपरगाव तालुक्यातील युवकांसाठी भव्य “वाजवेल तो गाजवेल ढोल ताशा स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या २ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील मैदान, कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.यासाठी भरघोस बक्षिसांचे आयोजन देखील करण्यात आले आहे असे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यापुरती मर्यादित असलेली ही स्पर्धा दरवर्षी अत्यंत दिमाखात आयोजित केली जाते. विविध ढोल-ताशा पथकांना एकत्र येऊन कौशल्य दाखविण्याची, तालबद्धतेने सजून गाजविण्याची ही संधी असते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकात किमान १५ सदस्य असणे अनिवार्य आहे. तसेच वेशभूषा, नियम व अटी यासंबंधीची सविस्तर माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचा ८१८१९०९०९० हेल्पलाइन क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे.

जाहिरात

गणेशोत्सव हा आनंद, एकोपा आणि परंपरेचा सण असून त्यात ढोल-ताश्यांचा गजर वातावरणात उर्जा आणि उत्साह निर्माण करतो. या माध्यमातून केवळ कलागुणांना वाव मिळत नाही तर तालुक्यातील युवा कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठही मिळते. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमाची संकल्पना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची आहे. त्यांनी युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अशा उपक्रमांची परंपरा निर्माण केली आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे हे आगळेवेगळे उपक्रम सामाजिक बांधिलकीसह युवकांना प्रोत्साहन देणारे ठरत असून कोपरगाव तालुक्यातील ढोल-ताशा पथकांसाठी “वाजवेल तो गाजवेल” ही स्पर्धा एक वेगळा उत्साह व प्रेरणा निर्माण करणार आहे.अधिकाधिक पथकांनी यात आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.ढोल ताशाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वादनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही सांगण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »