मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे यांचा वाढदिवस दरवर्षी भव्य वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याहीवर्षी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य नूर शेख यांनी देखरेखीखाली गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुलाब, जरबेरा, शेवंती, तुळशी, कोनोकारपस व आंबा अशा वनस्पतींच्या विविध प्रजातींचे एकूण ५०० झाडांचे रोपण करण्यात आले. अशा पर्यावरण पूरक उपक्रमांमुळे शाळेच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या मुख्य इमारती समोरच माईज गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाग गुलाब, शेवंती, जरबेरा, कन्हेर, मोगरा, पारिजात आदी आकर्षक फुलांनी बहरली असून

सुवासिक फुलांचा सुगंध शालेय परिसरात सर्वत्र दरवळत असून अतिशय निसर्गरम्य परिसरामुळे विद्यार्थ्यांना अतिशय प्रसन्न वाटत आहे. यामध्ये अजून फुल झाडांची आणि वृक्षांची भर पडल्यामुळे गौतम पब्लिक स्कूलचे निसर्ग सौंदर्य वाढणार आहे.सदर वृक्षारोपणासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, गार्डन इन्चार्ज उत्तम सोनवणे, नासिर पठाण, कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी, स्काऊटचे विद्यार्थी आदींनी मेहनत घेतली. शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व पालक वर्ग यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. आ.अशोकराव काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.