Breaking
संजीवनी उद्योग समूह

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या मिल रोलरचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पूजन संपन्न

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे वेगळेपण जपले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारीतील नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत ते सभासद शेतकऱ्यांचा सहकार्याने यशस्वी करण्यावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. सन २०२५-२६ या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन गुरुवारी विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव प्रास्ताविक करताना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामातील सर्व कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असून आठ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रारंभी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी स्वागत केले.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादन वाढ करून शेतकरी सभासदांना त्याचा सर्वाधिक फायदा कसा होईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.

जाहिरात

यंत्र देवतेला आराधना करून यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा सर्वाधिक दर देत आहे. मागील हंगामात उद्भवलेल्या अडचणीवर मात करून सभासद शेतकरी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यंदा पुढे जायचे आहे.याप्रसंगी संचालक सर्व विश्वासराव महाले, पांडुरंगशास्त्री शिंदे, अप्पासाहेब दवंगे, त्रंबकराव सरोदे, ज्ञानदेव औताडे, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, विलास वाबळे, मोहनराव वाबळे, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर होन, विलासराव माळी, बापूसाहेब बारहाते, सतीश आव्हाड, सर्व खाते प्रमुख, उप खाते प्रमुख कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »