संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज
चाणक्य नीतीचा अवलंब करून जीवन समृध्द बनवा-तहसिलदार महेश सावंत

[wps_visitor_counter]
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विद्यार्थ्यांनी चाणक्य नीती नुसार बकोध्यानं, काकचेष्टा , श्वाननिद्रा, अल्पाहारी व गृहत्यागी या पंचसुत्रीचा अवलंब केल्यास ते आपल्या ध्येयापर्यंत जावुन त्यांचे जीवन समृध्द होईल. विद्यार्थी दशेतील उर्जा प्रचंड असते, मात्र या उर्जेला योग्य दिशेने वळवा, असा सल्ला कोपरगांवचे तहसिलदार महेश सावंत यांनी दिला. संजीवनी युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलाजी मध्ये इ. १० वी नंतर सहा वर्षे अभ्यासक्रमाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींगला नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या स्वागत समारंभात सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते. विद्यापीठाचे प्रसिडेंट अमित कोल्हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आय सोर्स इन्फोसिस्टिम प्रा. लि. च्या कार्पोरेट हेड व ट्रेनर श्रीमती मंजिरी कुलकर्णी, विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर, डीन डॉ. कविथा राणी पी., आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. ठाकुर व डॉ. कविथा राणी पी. यांनी उपस्थितांचे स्वागत करून कोर्स बध्दल माहिती देत नियमावली सांगीतली तसेच भविष्यातील संधी सांगीतल्या. सावंत यांनी पंचसुत्रीचे विश्लेषण करत या पंचसुत्रीचा विद्यार्थ्यांनी कसा अवलंब करावा, हे स्पष्ट केले. बकोध्यानं म्हणजे बगळा पाण्यात एक पायावर उभा राहतो व मासा पकडण्यावर लक्ष ठेवतो, तसे विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहीजे. काकचेष्टा म्हणजे कावळा नवीन जाणुन घेण्याची तिव्र इच्छा ठेवतो, तसे विद्यार्थ्यांनी हिताच्या नवीन बाबी माहिती करून घेणे गरजेचे आहे. श्वाननिद्रा म्हणजे कुत्र्याप्रमाणे झोपा अर्थात कुत्रा झोपेत सुध्दा संवेदनशील असतो, आणि काही वाटलेच तर लागलीच जागा होतो, तसे सतत जागरूक रहा आणि सजग ज्ञान मिळवा. अल्पोहारी म्हणजे विद्यार्थ्यांनी पाहीजे तेवढेच जेवल पाहीजे म्हणजे हाती घेतलेले कार्य करण्यासाठी चांगली उर्जा मिळेल. गृहत्यागी म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्यासाठी घरच्यांच्या मोह माया पासुन दुर राहीले पाहीजे. गुणवंत विद्यार्थी घडण्यासाठी त्यांनी कुंभारचे उदाहरण दिले. ते म्हणाले मडके बनविण्यासाठी चिखलाचा गोळा चाकावर फिरत असतो,

तेव्हा त्या गोळ्याला आकार देण्यासाठी कुंभार एका हाताने वरून ठोके देत असतो, परंतु दुसऱ्या हाताने बनत असलेल्या मडक्याला मधुन आधार देत असतो. तसेच शिक्षकांचे असते, ते आपला विद्यार्थी उत्तम घडावा यासाठी रागावतील , बोलतील परंतु कुंभारासारखा दुसऱ्या हाताचा आधार असेल. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की जीवनात चांगल्या मित्रांचे जाळे निर्माण करावे. अनुभवांच्या चटक्यांनी माणुस मोठा होत असतो, त्यासाठी सकारात्मक रहा. प्रत्येक समस्येला पर्याय असतात. म्हणुन धीर व संयम सोडू नका. भविष्यात मुलाखतीसाठी तसेच वरिष्ठ व्यक्तिंशी संवाद साधताना आपले भाषा कौशल्य, देहबोली, संवादातील आवाजाची पातळी आणि योग्य शब्द फेक या बाबी महत्वाच्या आहेत. पैसा कमवता येतो परंतु गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही म्हणुन विविध गुणात्मक बाबी आत्मसात करताना वेळेचे नियोजन करा. वास्तव स्वीकारून त्यानुसार बदल करा. शिकत राहणे ही निरंतर प्रक्रिया आहे.अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमित कोल्हे म्हणाले की सुमारे ४२ वर्षांपूर्वी स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी संजीवनी संकुलाची स्थापना केली. त्यामुळे आज जगभर संजीवनीचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी अंतर्गत विविध संस्था वाटचाल करीत आहेत.त्यांच्या संकल्पनेतुन येथिल प्रत्येक बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांने तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडून स्वावलंबी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात. पहिला पर्याय नोकरी, दुसरा पर्याय उच्च शिक्षण आणि तिसरा पर्याय स्वतःचा व्यवसाय. प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पुढील सहा वर्षे चांगला अभ्यास करून सर्व बाबतीत सहभाग नोंदवावा. त्यांची पुढील ६० वर्षे आनंदात जातील.शेवटी रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे यांनी आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]