Breaking
संजीवनी उद्योग समूह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने जगाला योगाचे महत्व समजले – स्नेहलताताई कोल्हे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

टाकळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग ही भारताची अमूल्य देणगी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच आज ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण विश्वात साजरा होत आहे.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी योगाच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, “योग ही एक जीवनशैली आहे. मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक पातळीवर नेऊन भारताची सांस्कृतिक ओळख पुन्हा उभारली आहे.

आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार केला पाहिजे.कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून योगाचे सत्र अनुभवले. प्रमुख उपस्थितांमध्ये संदीप देवकर (सरपंच, टाकळी), संजय देवकर (उपसरपंच), निलेश देवकर (सदस्य), रामदास देवकर सामाजिक कार्यकर्ते, अंबादास देवकर (टी.डी.बी चेअरमन), चंद्रकांत देवकर (२ नं. सोसायटी चेअरमन), सुनील देवकर (माजी सभापती पंचायत समिती), पुंडलिक देवकर (वी. चेअरमन), सुनील पाईक (ग्रा. सदस्य), लक्ष्मण मालकर, अंबादास देवकर, सुभाष देवकर, आप्पासाहेब देवकर, बाळासाहेब देवकर,रामदास जगदाळे, संजय जोशी, अशोक देवकर, बाळासाहेब देवकर, रमेश देवकर, दत्तात्रय भालकर, गोरख डिबरे, अनिल मालकर यांचा समावेश होता.आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. घोलप सर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. मनोज गोळेचा, डॉ. तुषार गलांडे , डॉ. शेख मडम,टाकळी उप वैद्यकीय अधिकारी यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »