संजीवनी उद्योग समूह

अब वह दिन भी दूर नहीं, कोपरगांव का व्यापार सबसे भारी है – युवानेते विवेकभैय्या कोल्हे

0 6 0 0 2 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगांव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आज रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी ‘कृष्णाई कार्यालय, कोपरगांव’ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांतर्गत ‘ग्राहक जागृती प्रबोधन’, ‘व्यापारी समस्या चर्चा’, ‘ज्येष्ठ व्यापारी सन्मान’, ‘नवउद्योजक सत्कार सोहळा’ तसेच “अर्धा दिवस आपल्यासाठी” या स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी कोपरगांव मधील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमात व्यापारी बाईक रॅलीचाही समावेश होता, तर ‘सहकार बास्केट’ या नावाच्या मोबाईल ॲप्लिकेशनचे उद्घाटन सुद्धा याच दिवशी करण्यात आले.आपले मनोगत व्यक्त करताना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले की, “कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवले असून, या माध्यमातून ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा सन्मान आणि नवउद्योजकांचा गौरव करण्यात आला आहे.” गेल्या कित्येक वर्षांपासून कोपरगांव बाजारपेठेने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत बाजारपेठेने टिकून राहण्यासाठी ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी घेतलेले कष्ट अमूल्य आहेत, असेही ते म्हणाले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनानुसार भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, या यशात आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांचाही वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यापाराशी निगडित विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडताना ऑनलाईन-ऑफलाईन व्यापारातील विसंगती, ग्राहक मानसिकतेतील बदल, शिर्डी-कोपरगांव MIDCचा समावेश, स्मार्ट सिटी संधी गमावणे, तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता यावर भाष्य केले.कोपरगांवला कधी काळी कॅलिफोर्निया म्हटले जायचे, मात्र स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी बाजारपेठेला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. नवउद्योगांना पाणी उपलब्ध नसल्याने अडथळे येत आहेत.

जाहिरात
जाहिरात

यावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे ते म्हणाले.त्यांनी दर महिन्याला व्यापारी संवाद बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला तसेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. व्यापाऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्याची गरजही त्यांनी मांडली.“डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये भारताचा वाटा ४८% इतका मोठा आहे. त्यामुळे व्यापारात डिजिटल परिवर्तन स्वीकारणे अपरिहार्य आहे. व्यापाऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू, याची ग्वाही देतो,” असेही ते म्हणाले.”देश ने दी ललकारी, अब हमारी बारी है,वो दिन भी दूर नहीं, कोपरगांव का व्यापार सब पर भारी है!”
अशा शब्दांत विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व उपस्थितांमध्ये ऊर्जा प्रेरित केली. या कार्यक्रमास कोपरगांव परिसरातील मान्यवर, ज्येष्ठ व्यापारी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, युवा व महिला आघाडीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, गोदावरीचे दूध संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राजेंद्रजी बंब, अजितशेठ लोहाडे, तुलसीदास शेठ खुबानी, सुधीर डागा, प्रदीप साखरे, शरदनाना थोरात, केशवराव भवर, बबलूशेठ वाणी, नारायणशेठ अग्रवाल, योगेश बागुल, अनिल जाधव आदी मान्यवर तसेच कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ, संचालक मंडळ, युवा आघाडी संचालक मंडळ आणि महिला आघाडी संचालक मंडळ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 0 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे