Breaking
उबाठा शिवसेना

उबाठा शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदी कलविंदरसिंग दडियाल 

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटानं अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहिर केले असुन त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,सचिव विनायक राऊत यांनी मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. कि कोपरगाव शहरातील कलविंदरसिंग दडियाल यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.दडियाल हे कोपरगाव शहरप्रमुख होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रभावी कार्य केले.विविध आंदोलने व गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सोडविल्या आहे.आजच्या शिवसेनेच्या कठीण काळात देखील त्यांनी उत्तम संघटन केले.त्यांच्या या प्रभावी कार्यामुळे वरिष्ठांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या कार्यकरणी मध्ये जिल्हा समन्वयक कलविंदरसिंग दडियाल तसेच कोपरगाव विधानसभा अध्यक्ष किरण खर्डे,तालुकाप्रमुख पदी संजय दंडवते (कोपरगाव पूर्व-उत्तर विभाग),तालुका प्रमुख गंगाधर राहणे (कोपरगाव दक्षिण-पश्चिम विभाग),

जाहिरात
जाहिरात

सहसंघटक अशोक कानडे (कोपरगाव विधानसभा)सहसमन्वयक राजू भाई शेख (कोपरगाव विधानसभा) अशी पदे जाहिर करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा खासदार भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा सह संपर्क प्रमुख,उत्तर नगरचे राजेंद्र मुरलीधर झावरे, कोपरगाव शहर प्रमुख सनी रमेश वाघ,कैलास जाधव पप्पू पडियार,रंजन जाधव,रवि कथले,शेखर कोलते,बालाजी गोर्डे,नितीश बोरुडे,आशिष निकुंभ,राहुल देशपांडे,कुणाल लोणारी,ओम बागुल,निखिल जोशी,बाळासाहेब साळुंखे, अशोक पवार,इरफान शेख, विकास शर्मा,सुनील कुंढारे, राहुल साटोटे, निखिल मढवई,मधू पवार यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्याने कार्यकरणी जाहिर झाल्यामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »