कोपरगाव तालुका शिवसेनेचा १ ऑगस्ट रोजी “निर्धार मेळावा”

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक,युवा सैनिक, महिला आघाडी, बूथ प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख, वार्ड प्रमुख यांची अत्यंत महत्वाची बैठक व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित केली असल्याची माहिती कोपरगाव शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.सदर बैठकी साठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावासाहेब खेवरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,जिल्हा संघटक प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,शहर प्रमुख सनी वाघ, संजय सातभाई, योगेश बागुल, अतुलशेठ काले, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, कालू आप्पा आव्हाड, प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदरसिंग दडियाल, भरत मोरे, रवी कथले, अस्लम शेख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपनाताई मोरे, आदी उपस्थित राहणार आहेत, सदर बैठकीत पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशा संदर्भात, तसेच पुढील निवडणुकांच्या संदर्भात विचार विनिमय करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना, युवासेना, वाहतूक सेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी ठाकरे यांनी केले आहे.