संजीवनी उद्योग समूह

उजनी टप्पा क्रमांक एक अखेर सुरू नागरिकांनी मानले स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार

0 5 3 8 1 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

धोंडेवाडी,अंजनापुर,जवळके,काकडी,बहादराबाद,रांजणगाव,शहापूरसह परिसराला पाण्यासाठी महत्वाची असणारी उजनी जलसिंचन योजना टप्पा एक मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना संपर्क करून सुरू केली.या तत्परतेमुळे टप्पा एक सुरू होण्यास मदत झाली त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहे.झगडे फाटा ते कोपरगाव संगमनेर तालुका हद्दीचा मुख्य रस्ता मातीमोल झाला आहे.दर्जाहीन कामामुळे दहा कोटींचा शासकीय निधी वाया गेला आहे.प्राप्त निधीचा गैरवापर झाला आहे अशी भावना नागरिकांची आहे, त्यामुळेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.काहीच दिवसात रस्ता उखडला असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आमची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सहकार्य करावे व आपल्या सहकार्याने आमचा हा प्रश्न देखील लवकर मार्गी लावावा यासाठी आम्ही आग्रही आहोत.विद्यमान आमदार काळे यांनी ठेकेदार पूरक धोरण घेतल्याने नागरीकांना हाल सोसावे लागत आहे.केवळ आमच्याच भागात नव्हे तर संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात रस्त्यांची चाळण झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांना पावसाळ्यात घसरगुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.आमचा मुख्य रस्ता असताना देखील त्याच्या कामात मोठा अपहार झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.या गैरकारभारा विरोधात आपण लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी कोल्हे यांच्याकडे केली आहे.ज्या प्रमाणे उजनी पाणी प्रश्नात आपण तत्परतेने लक्ष घातले तसेच या मुख्य रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी व सबंधितांकडून झालेल्या निकृष्ट कामाची सुधारणा होण्यासाठी पुढाकार घ्यावा.शेतकरी,नागरिक,विद्यार्थी आमचे दळणवळण या मार्गाने अधिक असल्याने ज्यांच्या हाती कारभार होता ते सपशेल फोल ठरल्याचे आता आपणच आमचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.माझे आपणास नेहमी सहकार्य होते आणि पुढेही राहील असे सौ.कोल्हे म्हणाल्या.यावेळी टि.डी.बी संचालक रावसाहेब (बंडू) थोरात,उपसरपंच सुनील थोरात,सामाजिक कार्यकर्ते परसराम शिंदे,बाबासाहेब थोरात,महेश थोरात आदींसह शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे