संजीवनी विद्यापीठात मिळणार इंजिनिअरींगची इंटिग्रेटेड डिप्लोमा व डीग्री बी.टेक सह अन्य कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी विद्यापीठात मागील वर्षापासून बी. टेक.(एआय, एआयएमएल, एआयडीएस, सायबर सिक्युरिटी व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग), बीबीए, बी. कॉम., एमबीए असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. आता संजीवनी विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी मध्ये चालु शैक्षणिक वर्षापासून इ. १० वी नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असुन या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा वर्षांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगचा डीप्लोमा आणि डिग्री दोनही मिळणार आहे. विद्यापीठाच्याच प्रवेश परीक्षेतुन प्रवेश निश्चित केला जाणार आहे. तसेच चालु शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अंतर्गत बीसीए, एमसीए, बी.एससी (केमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि फुड न्यट्रिशन), एम.एससी (केमेस्ट्री व मायक्रोबायोलॉजी) हे अभ्यासक्रही सुरू करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या अकॅडमिक बोर्ड ऑफ स्टडीजने मान्यता दिली आहे.विद्यार्थी व पालकांना प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की डिग्री इंजिनिअरींगला प्रवेश घ्यायचा असेल तर इ.१२ वी सायन्स करून सीईटी किंवा जेईई या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते.त्यात चांगला स्कोअर असला तरच दर्जेदार इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. परंतु आता संजीवनी विद्यापीठाने खुल्या केलेल्या पर्यायामुळे हे सर्व अडथळे दुर होणार आहे.तसेच अनेक विद्यार्थी तीन वर्षांचा इंजिनिअरींगचा डिप्लोमा करून डिग्री इंजिनिअरींगच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु थेट दुसऱ्या वर्षाची प्रवेश क्षमता कमी असते. प्रवेश क्षमता मर्यादेमुळे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. आता संजीवनी विद्यापीठात इ. १० वी नंतर लागलीच बी.टेक डिग्री इंजिनिअरींग करणे सुलभ झाले आहे .

इ. १० वी व १२ वीचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरी मिळालीच पाहीजे या दृष्टीने विद्यापीठाने आयबीएम, फॉर्टिनेट, नॅसकॉम, मायटेक, झोहो, एचसीएल, सॅटकॉम, अशा नामांकित कंपन्यांशी व परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले असुन परदेशी विद्यापीठांच्या करारानुसार विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधीही मिळणार आहे. विविध इंडस्ट्रीजला लागणारे योग्य मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी कंपन्यांच्या सल्यानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. वरील प्रमाणे कोर्सेसच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांनी विविध कोर्सेसच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर यांनी केले आहे.