धोत्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे भाऊसाहेब गागरे बिनविरोध

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे भाऊसाहेब गागरे यांची लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दिनांक ८ मे २०२५ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे संचालक सुरेश जाधव, भगवान चव्हाण, सौ.आरती राजेंद्र जामदार, सौ.भारती विजय जामदार, सौ.शितल नामदेव चव्हाण, आजम शेख, मच्छिंद्र गायकवाड, कैलास चव्हाण, सौ.शीला पगारे आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते.याप्रसंगी सरपंच प्रदीप चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गाव राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व

युवा नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गावात वेगवेगळे विकासाचे कामे सुरू असून विविध शासकीय योजना गरजू साठी राबविल्या जात असल्याचे सांगत सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विचाराने सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करत संपूर्ण विकसित गाव करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत चव्हाण यांनी नवनिर्वाचित उपसरपंच गागरे यांचे अभिनंदन केले.तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी देखील उपसरपंच गागरे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.