इफको व संजीवनी ग्रुपच्यावतीने १८ एप्रिल रोजी शिर्डीत राज्यस्तरीय एकदिवसीय उस पीक परिसंवाद-विवेक भैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
इफको नविदिल्ली व संजीवनी ग्रुपच्यावतींने उस पीक खत व्यवस्थापनात नॅनो खतांचा वापर, कृत्रिम बुध्दीमत्ता उस उत्पादन व साखर उतारा या विषयावर शिर्डीच्या मॅरीगोल्ड रिजेन्सी येथे १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय एकदिवसीय उस पीक परिसंवादाचे आयोजन केल्याची माहिती इफकोचे संचालक, युवानेते व राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सर्व उस उत्पादक सभासद व शेतक-यांचे प्रति हेक्टरी पीकांचे उत्पादन वाढावे म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा वसा घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनांखाली थेट धडक कार्यक्रम शेतक-यांच्या बांधावर संजीवनीच्या कार्यक्षेत्रात घेत असुन त्यातुन राज्यातील शेतक-यांचे प्रबोधन व्हावे या उददेशाने शिर्डी येथे इफको व संजीवनी ग्रुपच्यावतींने एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन केले आहे.

यात इफको थीम बाबत आपण स्वतः, तसेच इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक यु. आर. तिजारे, इफको (पुणे) चे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार हे उस पीक खत व्यवस्थापनामध्ये इफको नॅनो खतांचा वापर, तर उस उत्पादन वाढीत एआय- कृत्रिम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर उस उत्पादन वाढ, साखर उतारा व त्यापुढील आव्हाने यावर मृदा शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे, वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट (पुणे) चे पीक उत्पादन व संरक्षणातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, तर इफको एम. सी. (पुणे) चे विभागीय विपणन व्यवस्थापक श्री. दौलत बोरस्ते हे उस रोग व कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून शेतक-यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत., तरी जास्तीत जास्त शेतकरी, साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी १८ एप्रिल रोजी उपस्थित राहुन या परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन इफको व संजीवनी ग्रुपच्यावतीने करण्यांत आले आहे.