संजीवनी उद्योग समूह

महावितरणचे उत्तर दक्षिण असे दोन स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय व्हावे – विवेकभैय्या कोल्हे

0 5 4 1 0 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणचे अधिक्षक अभियंत्याचे दोन स्वतंत्र सर्कल ऑफिसची मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची कार्यवाही सूचना संबंधित विभागाला केली आहे.अहिल्यानगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय व्यापक आहे.१७ हजार चौ. कि.मी.क्षेत्रफळ असून १४ तालुक्यात सुमारे ११ लाख १४ हजार वीज ग्राहकांची संख्या आहे.शेती,गृह,व्यावसायिक, औद्योगिक वापराचे ग्राहक यात असून अधीक्षक अभियंत्याचे सर्कल ऑफिस हे सध्या एकच असून त्यामुळे शेवटच्या तालुक्यातील नागरिकाला आपली समस्या सोडवून घेण्यासाठी थेट १२५- १५० किमी पर्यंत अंतर पार करावे लागते हे दुर्देवी आहे त्यामुळे उत्तर आणि दक्षिण असे दोन स्वतंत्र कार्यालय निर्माण झाल्यास मोठा प्रश्न सुटेल अशी मागणी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला असून यावर कार्यवाही करण्याची सूचना संबंधित विभागाला केली आहे.

जाहिरात
जाहिरात

महावितरण विभागाने देखील सकारात्मक पावले तातडीने उचलत सदर प्रश्न समजावून घेत त्यावर उचित कार्यवाही सुरू केली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अंतरावर प्रवास करून काही कामे पूर्ण करणे जिकिरीचे होत असल्याने हा प्रश्न जिव्हाळ्याचा बनला आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करून शासनाने दिलेल्या सोयी सुविधा अधिक तत्पर कशा देणे शक्य होईल यावर अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. या प्रश्नात देखील त्यांनी लक्ष घातल्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळेल अशी भावना विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे