कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ३२२० घरकुले मंजूर -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात ‘पंतप्रधान आवास योजने अंतर्गत’ पहिल्यांदाच पात्र लाभार्थ्यांना एकाचवेळी ३२२० घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली असून त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळवून देणे तसेच गरिबी रेषेखालील कुटुंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यात यापूर्वी देखील या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु एकाचवेळी ३२२० घरकुले मंजूर झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील कित्येक कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार होवून त्यांचे जीवनमान उंचावनार आहे. त्याचबरोबर कित्येक दिवसांचे स्वप्न सत्यात उतरून त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार असल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोपरगाव तालुक्यात पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३२२० घरकुले मंजूर झाले आहेत ही बाब समाधानकारक आहे.

समाजातील सर्वात गरीब आणि भूमीहीन घटकांचा विचार करून त्या नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे पंतप्रधान आवास योजनेतून स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.शबरी आवास व रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न सुरू आहेत.नुकत्याच मंजूर झालेल्या घरकुल योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी काही त्रुटी किंवा अडचणी येत असेल तर पात्र लाभार्थ्यांनी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. जरी अडचणी सुटल्या नाही तर पंचायत समिती व जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना केले आहे.तसेच ३३५० घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून हे उद्दिष्ट देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.