आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

विरोधक छोट्या मनाचे, त्यांना विकास दाखवून द्या -आ.आशुतोष काळे

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी आलेल्या तीन हजार कोटी निधीतून मतदार संघात झालेली विकासकामे त्यामुळे नागरिकांच्या दूर झालेल्या अडचणी हे सर्व मतदार संघातील जनता अनुभवत आहे. मात्र आपले विरोधक छोट्या मनाचे असल्यामुळे त्यांना झालेला विकास दिसत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून विरोधकांना विकास दाखवून द्यावा असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व सेल अध्यक्षांचा सत्कार सोहळा नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या पाच वर्षात जो काही विकास झाला तो विकास यापूर्वी कधीच झालेला नव्हता. विरोधकांकडे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याची चाळीस वर्ष सत्ता होती त्यांना देखील त्या चाळीस वर्षात एवढा मोठा निधी आणता आला नाही हि वस्तुस्थिती आहे. मतदार संघातील जनतेला पण माहित आहे मात्र विरोधकांकडे विकास पाहण्यासाठी मोठ मन नसल्यामुळे त्यांना विकासच दिसत नाही त्याला आपण काही करू शकत नाही. त्यांची पारंपारिक पद्धत आहे प्रश्न सोडवायचे नाहीत त्यावर वर्षानुवर्ष राजकारण करायचे. त्यांच्या राजकारणाची हि पद्धत पाच वर्षात मोडून काढली आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधक कुटनीती वापरून जनतेला काय काय आश्वासन देतील त्याची कल्पना मी व तुम्ही सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जातांना गाफील राहून चालणार नाही.अतिशय चिकाटीने व संपूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र घरपोहोच देण्यात येणार असल्याचे सांगत पदाधिकारी जे पद भूषवतील त्या पदाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त करून उर्वरित कार्यकारिणीही लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकारी व सेल अध्यक्ष पुढीलप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कार्याध्यक्ष पंकज पुंगळ, युवक तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. अनिता खालकर, विद्यार्थी कार्याध्यक्ष शुभम शिंदे, युवती तालुकाध्यक्षा सौ.वैशाली आभाळे, सेवा दल सेल गणेश जाधव, अल्पसंख्यांक सेल मतीन शेख, सामाजिक न्याय सेल यशवंत निकम, डॉक्टर सेल डॉ.आय.के सय्यद, वकील सेल अॅड. गणेश भोकरे, किसान सेल विकासराव शिंदे, सोशल मिडिया सेल महेंद्र वक्ते, सहकार सेल विकास चांदगुडे, कामगार सेल नारायण होन,ज्येष्ठ नागरिक सेल पाटीलबा वक्ते,ओ.बी.सी. सेल राहुल सोनवणे, माजी सैनिक सेल अध्यक्ष युवराज गांगवे, माजी सैनिक सेल कार्याध्यक्ष संजय जगताप आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक मंडळ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे