जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या गंगुबाई जाधव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाच्या गंगुबाई बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैशाली संदेश भोंगळे यांनी रोटेशन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सौ. सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगुबाई जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या प्रक्रियेत गंगुबाई जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सौ. सुवर्णा पवार यांनी जाहीर केले.यावेळी सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रोसिडिंग ग्रामविकास अधिकारी यांनी सदस्यांना वाचून दाखवले. सर्व सदस्यांचे आभार मानले निवडणूक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग व त्यांना सहकार्य लिपिक आनंद बारसे, संगीता वक्ते यांनी केली.यावेळी कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते, पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव वक्ते, संचालक सतीश आव्हाड,विजय रोहोम, आर पी आय नेते दिपक गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच यशवंत आव्हाड, तंटामुक्त समिती चे अध्यक्ष जालिंदर चव्हाण,रमेश वक्ते, किशोर वक्ते, प्रदिप गायकवाड, ताराचंद लकारे,अनिता वक्ते, धनश्री वक्ते,मधुकर वक्ते,गिरीधर गुरसळ,भाऊसाहेब वक्ते,संजय वक्ते,वैशाली भोंगळे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच गंगुबाई जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष जालिंदर चव्हाण यांचा सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसरपंच गंगुबाई जाधव यांनी सांगितले की सर्वांना एकत्र घेऊन गावच्या विकासाठी प्रयत्न करणार असून नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ काम करणार आहे असा विश्वास दिला.