संजीवनी उद्योग समूह

धनगरवाडी येथे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे जयंती प्रेरणा दिन साजरा

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती होती.या दिवसाचे औचित्य साधून कोपरगाव मतदार संघाचे विविध ठिकाणी प्रेरणा दिन संपूर्ण सप्ताहात साजरा करण्यात येत आहे. राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे देखील २८ मार्च रोजी प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात प्रतिमापूजन करून साजरा करण्यात आला.कोपरगाव तालुक्यासह राज्यभर स्व. कोल्हे यांचे मोठे जनसंपर्काचे जाळे होते.अफाट कार्यशक्ती आणि कार्यतत्पर स्वभाव यामुळे त्यांना मानणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर आहे. तळागाळातील नागरिकांना मदत करणे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत मदत करणे या कार्यशैलीने स्व.कोल्हे नेहमी ओळखले जात होते.धनगरवाडी येथे त्यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे.गणेश परिसरात कोल्हे यांनी केलेला कायापालट या संपूर्ण भागातील शेतकरी आणि नागरिक यांना सुखावणारा आहे.याच अनुषंगाने प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गोपीनाथ खरात (सरपंच),राजेंद्र रक्टे (ग्रा. सदस्य),साहेबराव आदमाने (उप सरपंच),प्रमोद लांडे,रामभाऊ रक्टे,सोपान आदमाने,योगेश रक्टे,दत्तू रक्टे,रमेश बोंडे,संभाजी आदमाने,सुंदरलाल तागड,महेश रक्टे,राजेंद्र रक्टे,नानासाहेब सातव,बळीभाऊ रक्टे,वसंत बळे,दामू रक्टे,संभाजी आदमाने,लक्ष्मण रक्टे,रंगनाथ राशिनकर (मा. उप सरपंच), बालाजी रक्टे,दिगंबर रक्टे,अनिल भोडे,कचरू गवते,रामभाऊ राशिनकर,जगन्नाथ आदमाने,पुंजा राशिनकर,अनिल रक्टे ( तंटामुक्ती अध्यक्ष),भाऊसाहेब राशिनकर,बाळासाहेब रक्टे आदींसह बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे