संजीवनी उद्योग समूह

न्यू इंग्लिश स्कूल पढेगाव येथे प्रेरणादिन विविध उपक्रमांनी साजरा

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती २४ मार्च रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली.या दिवसाचे औचित्य साधून कोपरगावसह पंचक्रोशीत प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे.हा संपूर्ण सप्ताह प्रेरणा सप्ताह म्हणून पार पडत असून न्यू इंग्लिश स्कूल पढेगाव येथे वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम,वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.माजी मंत्री स्व .शंकरराव कोल्हे यांचे व्यक्तिमत्व सामाजिक जडणघडण होण्यासाठी कृतिशील होते.लोकोपयोगी कामाला महत्व देणारे ते होते.त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी वैचारिक प्रेरणा घेत पढेगाव शाळेने स्तुत्य उपक्रम घेतले. प्रारंभी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर विविध उपक्रम पार पडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक उसरे सर यांनी मानले.प्रसंगी कु. प्राप्ती वाबळे, कु. अमृता मलिक,कु. स्वाती वाघमारे,कु. अनुष्का सोमनाथ शिंदे या विद्यार्थ्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जीवनपटावर विचार व्यक्त केले.ह.भ.प. जगताप महाराज,उत्तमराव चरमळ,गणेश शिंदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. उत्तमराव चरमळ यांनी कोल्हे साहेबांनी त्यांच्या जीवनात केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली.शिक्षण व शेती याविषयी त्यांची दूरदृष्टी व पाण्यासाठी आयुष्यभर केलेला संघर्ष यासह शेतीवरील संशोधन व साखर उद्योगातील दूरदृष्टी यावर दृष्टिक्षेप टाकला.गणेश शिंदे यांनी देशातील शेतकऱ्यांना लाभ झालेल्या रुमणे मोर्चाची आठवण सांगितली.स्वाभिमानी आणि एक वचनी स्वभावाची किनार उलगडली.यावेळी प्रकाश शिंदे, दिलीप पगारे,संपतराव तरटे,गणेश पगारे,बाबासाहेब शिंदे,अरविंद लंके,शंकर वाघ,सिताराम चरमळ,बाळासाहेब मापारी,संतोष चरमळ,गोरक्षनाथ मापारी,बबन शिंदे,मधुकर पगारे,नारायण पगारे,सतीश पगारे,ज्ञानदेव दाणे,चंद्रकांत शिंदे,अशोक तिपायले,पंढरीनाथ म्हस्के,राजेंद्र शिंदे,दत्तात्रय वाघ,किरण शिंदे,अशोक शिंदे,सुदाम करपे ,अनिल शिंदे,परसराम कदम,बाळासाहेब मापारी,रवींद्र कदम,सुभाष महाराज जगताप,एकनाथ काळे,मुख्याध्यापक उसरे सर,पुणे सर,उकिरडे सर,गायकवाड सर,कोकाटे सर,श्रीमती भागवत मॅडम,शिवाजी दाने,उत्तम पगारे यासह कार्यकर्ते,शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे