अतिक्रमण कारवाईत नागरिकांची देखील काळजी घ्या, बेघर होऊ देऊ नका बिपीनदादा कोल्हे यांची मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अतिक्रमण कारवाई करताना अनेक नागरिकांचे हातावर पोट असल्याने त्यांना उजाड होतील अशी प्रक्रिया राबवू नये. अत्यंत रस्त्यावर किंवा रहदारीला अडथळा आहे अशा ठिकाणी कारवाई करणे हा पालिकेचा अधिकार आहे मात्र कुणाचा निवारा उध्वस्त होऊन बेघर होण्याची वेळ येत असेल तर अशा बाबतीत सहानुभूतीने विचार करणे आवश्यक आहे. कोरोना काळानंतर बाजारपेठ पूर्ववत होऊन आता कुठे लोक स्थिर स्थावर होऊ लागले आहेत त्यातच अतिक्रमण कारवाई झाल्यास लहान मोठे व्यावसायिक सर्वांनाच याचा फटका बसणार आहे त्यामुळे नियमाचे पालन करताना कोपरगाव नगरपरिषदेने मध्यम भूमिका ठेवावी अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.कुठल्याही अतिक्रमण कारवाईचे पडसाद हे त्या शहराला आणि गावाला अनेक वर्षे भोगावे लागतात. या पूर्वी कोपरगाव शहरात २०११ आणि त्यानंतर बस स्थानक परिसरात मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिक्रमण मोहिमेचे परिणाम भीषण होते.

अतिक्रमण काढूच नये असा कुणाचा विरोध नाही मात्र सर्वच नागरिक आपले आहे अगदीच कुणाच प्रपंच उघड्यावर येणार असेल तर त्यातून साध्य काही होणार नाही. ज्यांचे दुकान भाडोत्री, गुंतवणुक करून आहे त्यांच्या समोर कुणी अतिक्रमण करणे हे समर्थनीय नाही त्यामुळे अशा व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्याचा काही विचार होणे गरजेचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपण साजरे करतो मात्र शिवरायांनी गावे शहरे वसवली आणि वाढवली होती त्यांचा वैचारिक आदर्श स्थानिक प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवत मध्यम मार्गाने नियमांचे पालन देखील होईल आणि कुणी उध्वस्त देखील होणार नाही याची काळजी घेऊन कारवाईकडे पहावे अशी भूमिका कोल्हे यांनी मांडली आहे.