संजीवनी उद्योग समूह

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती संवर्धनातुन शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न-विवेकभैय्या कोल्हे

0 5 3 8 3 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली शेतीला जोडधंदा उपलब्ध करून देण्यांसाठी शेततळ्यातील मस्त्यशेती संवर्धनावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात बायोफ्लॉक्स मत्स्य शेती संवर्धनातुन शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. बायोफ्लॉक्स मत्स्य शेतीसंदर्भात लवकरच तरूण उद्योजकासह शेतक-यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.तालुक्यातील शिंगणापुर येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर संजीवनी फार्मर्स फोरम, संजीवनी मत्स्य संस्था, मत्स्य व्यवसाय विभाग अहिल्यानगर व बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने एकदिवसीय मत्स्य शेती संधी व सुविधा यावर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी संजीवनी मत्स्य संस्थेचे अध्यक्ष कारभारी लभडे व कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नविन उपक्रमाचे प्रमुख संजीव पवार यांनी प्रास्तविकात गेल्या वर्षभरात मत्स्य शेती संदर्भात केलेल्या प्रयोगासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.याप्रसंगी अहिल्यानगर मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त रमेशकुमार घडील यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा व नॅशनल फिशरीज डिजीटल उपक्रम अंतर्गत विविध योजनेची माहिती देवुन तरूण उद्योजकासह शेतक-यांनी मत्स्य शेतीत मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वतःबरोबरच परिसराची आर्थीक क्रयशक्ती वाढवावी. संजीवनी फार्मर्स फोरमचे सर्वेसर्वां विवेकभैय्या कोल्हे यांनी ग्रामिण भागातील शेतक-यांना मत्स्य शेती संवर्धनाबाबत सातत्याने माहिती देत असल्याचेही ते म्हणाले. विकास कांबळे यांनी बायोफ्लॉक्स मत्स्यशेतीबाबत संपुर्ण मार्गदर्शन केले. प्रतिक्षा पाटेकर यांनीही मत्स्य शेती संवर्धनाबाबत शेतक-यांचे शंकांचे निरसन करून प्रयोगात्मक शेतीची माहिती दिली, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक महेश कानविंदे यांनी केंद्र व राज्य शासनांच्या विविध शेती कर्जाबाबत माहिती देत मत्स्य संवर्धनातुन कोपरगांवचा नांवलौकीक वाढवावा असे आवाहन केले. बँक ऑफ इंडिया कोपरगांव शाखेचे व्यवस्थापक सुरेश यादव यांनीही शेतक-यांच्या शंकांचे समाधान केले. उदगीर येथील मत्स्य महाविद्यालयाचे डॉ.अजय कुलकर्णी यांनी ऑनलाईन पध्दतीने शेततळ्यातील मत्स्य शेती संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, शेती व्यवसायावर सातत्यांने संकटे येतात त्यातुन शेतक-यांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होते, त्यांचे अर्थकारण सुधारण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशात सातत्यांने विविध पायलट प्रकल्पांची आखणी करत ते संजीवनीत यशस्वी करून दाखविले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली गेल्या वर्षभरापासुन मस्त्य शेती संवर्धन उपक्रम थेट शेतक-यांच्या बांधावर राबवत आहे. ६३ शेतक-यांना २ लाख १५ हजार ९७५ मत्स्यबीज, २ हजार ५०० किलो खाद्याचे वाटप करून शेततळयातील मत्स्य शेती संवर्धनावर भर देत २०० शेतक-यांना सामुहिकरित्या सुरक्षा संरक्षण कवच व त्यांचे राष्ट्रीय मत्स्य डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी त्यांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मत्स्यशेती करत असताना शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी लाइफ जॅकेट वितरण करण्यात आले.पुढे ते म्हणाले की, बायोफ्लॉक तंत्रज्ञानातुन तिलापिया, पंगासिअस, अनाबसकोई, देशी/ गावठी मागुर, पाबदा मासेमारीसाठी क्रांतिकारकआहे. यात कमी प्रमाणात पाण्याचा पुर्नबदल केला जातो. जलचर मत्स्य उत्पादनावर पर्यावरणीय नियंत्रण सुधारण्यासाठी बायोफ्लॉक्स तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

जाहिरात
जाहिरात

या शेतीत तरूण उद्योजकासह शेतक-यांचा मोठ्या प्रमाणांत सहभाग वाढवुन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण विनामुल्य देवुन मत्स्य बिजापासुन ते त्याच्या उत्पादन व विक्री बाबतचे संपूर्ण मार्गदर्शन एका छताखाली देवुन शेतक-यांची आर्थीक समृध्दी साधली जाणार आहे. खिर्डीगणेश परिसरात मस्त्य खाद्य निर्मीती कारखान्याची उभारणी अंतिम टप्प्यात असुन वर्षाला १ कोटी मत्स्यबीज संजीवनी मत्स्य सोसायटी स्वतः तयार करून ते मागणीप्रमाणे शेतक-यांना पुरविले जाणार आहे. शेवटी विजय रोहोम यांनी आभार मानले.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, विलासराव वाबळे, बाळासाहेब संधान, शिवाजीराव कदम, ज्ञानेश्वर होन, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, सतिष आव्हाड, विलासराव माळी, डॉ गुलाबराव वरकड, बाळासाहेब शेटे, प्रकाश सांगळे, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, विष्णुपंत क्षीरसागर, संभाजी रक्ताटे, सोपानराव कासार, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, योगेश इंगळे, एच आर मॅनेजर विशाल वाजपेयी, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, यांच्यासह विविध संस्थांचे अध्यक्ष, आजी माजी संचालक, संजीवनी मत्स्य संस्थेचे सर्व मत्स्य उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे