संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये टेक संजीवनी तांत्रिक प्रदर्शनाचे मोठे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भावी आयुष्यात आपण काय होणार याची महुर्तमेढ आपल्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातच बहुतांशी ठरत असते. भविष्यातील वाटचालीकडे आपल्यातील संर्जनशिलता (क्रीएटिव्हीटी) महत्वाची ठरत असते. सर्जनशीलता, उद्यमशीलता, चिकाटी, नाविन्यता, विज्ञानवादी दृष्टीकोन , अशा अनेक व्यक्तीमत्वांची कोंदणे विकसिीत करण्यासाठी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये अनेक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना आकार देण्याचे कार्य केल्या जाते. या अनुषंगाने संजीवनी विद्यार्थी विकास कक्षाने सर्व इतर विभागांच्या मदतीने ‘टेक संजीवनी २०२५’ या भव्य तांत्रिक प्रदर्शन व सादरीकरणाचे आयोजन केले होते. यात संजीवनी सह इतर महाविद्यालयातील इंजिनिअरींग, पॉलीटेक्निक, एमबीए, कॉमर्स, सायन्स, बीबीएच्या सुमारे १००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवुन आपली प्रतिभासंपन्नता व वैज्ञानिक विचारांची झेप आजमावली.प्रारंभी नाशिक येथिल इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट ललीत बुब, इंडस्ट्री इन्स्टिटयूट कमिटीचे चेअरमन अलोक कनाणी, सुपर टेक इंडस्ट्रीजचे डायरेक्टर रणजित सानप, उद्योजक व संजीवनीचे माजी विद्यार्थी राहुल गांगुर्डे यांचे हस्ते व संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली संजीवनी फेस्ट या भव्य प्रदर्शणाचे व स्पर्धचे उद्घाटन झाले. यावेळी चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख, सर्व डीन्स, विद्यार्थी विकास कक्षाचे मुख्य समन्वयक डॉ.मकरंद कुलकर्णी व उपसमन्वयक प्रा. के.डी.पेटारे, आदी उपस्थित होते. यात आकरा प्रकारच्या विविध तांत्रिक प्रदर्शने व त्यांचे व सादरीकरणाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व बाबींचे नियोजन हे शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनीच केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी उत्कृष्ट नियोजनबाबत व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांच्या सर्जनशील प्रकल्पांबाबत अभिनंदन केले.या स्पर्धा विभाग निहाय घेण्यात येवुन प्रत्येक स्पर्धेत तीन प्रथम विजेते निवडण्यात आले. यात कॅड मॉडेलिंग स्पर्धेत संकेत लोखंडे, बेस्ट फ्रॉम वेस्ट स्पर्धेत वृषाली दुबे आणि सहकारी, वेब डेव्हलपमेंट इन ए लिमिटेड टाईम फ्रेम स्पर्धेंत प्रथमेश भावसार व ईश्वरी देसाई, रोबो रेसमध्ये सुमित गिरासे आणि सहकारी, टॉवर क्वेस्ट स्पर्धेत समृध्दी शिरोडे , ऋतुजा गागरे व प्रिया धुंगव, ड्रोन असेंब्ली स्पर्धेत यश शिंगाडे , यज्ञेश तांबे, आयुष जोंधळे व अनिऋध्द शिंदे , प्रकल्प स्पर्धेत प्रदिप राऊत, कोड वार्स मध्ये संतोषी कदम, आयओटी इंनोव्हेशनमध्ये मेघराज भावसार,श्रेय साळुंके, अरिन शिंदे व साहील पाटील, स्टार्टअ पिच मध्ये समिर शेख व सहकारी आणि पोस्टर मेकींग स्पर्धेत सुमित कोटमे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह व प्रामणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.