पुला टॅलेंट शो मध्ये अनुष्का वल्टे गिटार वादनात प्रथम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव तालुक्यातील दहिगाव बोलका येथिल मुळची रहीवासी असलेली अनुष्का चारूदत्त वल्टे या नऊ वर्षाच्या चिमुरडीने पुणे येथिल पुना लेडीज असोसिएशन या सेवाभावी संस्थने आयोजीत केलेल्या ‘पुलाज गॉट टॅलेन्ट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत गिटार वादनात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व प्रथम पुण्यातील अॅमेनोरा सिटी या ठिकाणी निवड चाचणी घेण्यात आली व त्यानंतर पिंपरी चिंचवड येथिल एल्प्रो सिटी येथे अंतिम फेरी घेण्यात आली. यात अनुष्काने आपल्या गिटार वादनाने परीक्षकांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या स्पर्धांमध्ये संगीत वाद्य वादन, गायन, नृत्य, अशा प्रकारे स्पर्धांचा समावेश होता. अनुष्का उत्तम हार्मोनियम वाजवुन गायनही करते. भविष्यात तिला संगीत व गायन क्षेत्रात करीअर करायचे आहे. यासाठी तिच्या पालकांनी वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून गायनाचे व संगीताचे धडे द्यायला सुरूवात केली. शाळेतही ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेवुन आपल्या कलेची अदाकारी उत्तम पध्दतीने सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविते.तिने महाराष्ट्र शासनाची संगीत प्रारंभिक परीक्षाही उत्तिर्ण केलेली आहे. अनुष्काला संगीत तज्ञ कीर्तीकुमार यांचेकडून न गिटार वादनाचो प्रशिक्षण मिळाले.