आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आ.आशुतोष काळेंच्या पुढाकाराने २५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रस्ता अखेर खुला झाला

0 5 3 7 6 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील रस्ता मागील २५ वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. जवळपास ३० शेतकरी कुटुंबाच्या वर्दळीचा व शिवार वाहतुकीचा रस्ता आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा रस्ता अखेर खुला झाला असून या शेतकरी कुटुंबांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.शिरसगाव येथील पालखेड चारी वन.एल.मायनर हद्दीत असलेला हा रस्ता कित्येक वर्षापासून बंद असल्यामुळे या कुटुंबांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत होत्या. त्याबाबत काही माहिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधत आपली कैफियत मांडून रस्त्याच्या अडचणी मांडल्या होत्या.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना हा रस्ता खुला करण्या बाबत योग्य तो तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली असता त्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने स्थानिक शेतकऱ्यांनी सहमती दर्शवित मागील २५ वर्षापासून कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. बुधवार दि.२९ जानेवारी २०२५ रोजी हा रस्ता शेतकऱ्यांना व नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी हा रस्ता खुला करण्यात महसूल प्रशासनाला यश आले.

जाहिरात
जाहिरात

तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते पालखेड या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात येवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा रस्ता अखेर शिवार वाहतुकीसाठी कायमचा खुला झाला आहे.या रस्त्यालगत २५ ते ३० शेतकरी वास्तव्य करत असून त्यांच्या शेतजमिनी याच रस्त्यावर असल्याने रस्त्या अभावी येथील स्थानिक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.संबंधित रस्त्याच्या अडचणी बाबत योग्य पर्याय शोधून रस्त्याचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांची भेट घेवून रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या सूचने नुसार तहसीलदार महेश सावंत यांनी तत्परतेने पाऊल उचलुन प्रमुख वादी असलेले व एकमेकांचे अतिशय जवळचे असणारे बोडखे व गायकवाड कुटुंबीय व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून समक्ष चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेवून सदर रस्ता खुला होणे सर्वच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सर्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तहसीलदार महेश सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनातून सर्वच शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होवून त्यांचा मागील २५ वर्षापासूनचा वाद संपुष्टात येवून या रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे