आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून वेस सोयगाव- रांजणगाव देशमुख मार्गे बस सेवा सुरु

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील वेस, सोयगाव, भडांगे वस्ती, रांजणगाव देशमुख,अंजनापुर,जवळके आदी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार नुकतीच या मार्गावर बस सेवा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी-
विद्यार्थिनींच्या व त्यांच्या पालकांच्या चिंता मिटल्या आहेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत वेळेवर जाण्यासाठी वेस सोयगाव-भडांगे वस्ती-रांजणगाव देशमुख-अंजनापुर-जवळके या मार्गाने बस सेवा सुरु करावी अशी मागणी वेस सोयगाव-भडांगे वस्ती-रांजणगाव देशमुख-अंजनापुर-जवळके आदी गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना लेखी पत्र देवून बससेवा सुरु करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून नुकतीच बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या गावातील असंख्य विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी मदत होणार असून यामध्ये जवळपास ६० विद्यार्थिनींची संख्या आहे.मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्यासाठी होत असलेली ससेहोलपट बससेवा सुरु झाल्यामुळे थांबणार असून विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्याबद्दल असंख्य पालकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. बससेवा सुरु झाल्याबद्दल बसचे रांजणगाव देशमुख मध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी बसच्या चालक-वाहकांचा सत्कार केला व पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.