विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल आ.आशुतोष काळेंचे गौतम पब्लिक स्कूलमध्ये जंगी स्वागत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये संस्थेचे विश्वस्त व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य आ.आशुतोष काळे यांचे विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सलिंग मीटिंगच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, विश्वस्त कारभारी आगवन, सय्यद सिकंदर चांद पटेल, किसनराव पाडेकर, बाबासाहेब कोते, सुनील बोरा, राधू कोळपे,दिलीप चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, अक्षय काळे, मधुकर बडवर आदी मान्यवर व संस्था सदस्य, प्राचार्य नूर शेख, सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य सुभाष भारती, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेव गुडघे शाळेत उपस्थित होते.विधानसभेची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्यानंतर आ. आशुतोष काळे प्रथमच गौतम पब्लिक स्कूलमध्ये येणार होते. त्यामुळे शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित आमदार काळे यांच्या स्वागताची भव्य जय्यत तयारी करण्यात आली होती. आ.आशुतोष काळे यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष मा. आ. अशोकराव काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे यांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

आ. आशुतोष काळे यांचे औक्षण करण्यात येवून प्रवेश मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या नववारीत नटलेल्या गौतमच्या विद्यार्थिनींकडून रंगीबेरंगी, मनमोहक फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी सज्ज असलेल्या गौतमच्या लेझिम पथक, झांज पथक, पावरी नृत्य पथकांनी आपापले नृत्याविष्कार एकाच वेळी सादर करून आ.आशुतोष काळे यांचे दिमाखात स्वागत केले. यावेळी वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही झाले. उत्तरार्धात शाळेच्या एनसीसी आणि स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देऊन सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांचे आ.आशुतोष काळे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर निलक, रमेश पटारे, गोरक्षनाथ चव्हाण, पर्यवेक्षक, सर्व हाउस मास्टर्स, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी काम पाहिले. प्रास्ताविक कारभारी आगवन यांनी केले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.
					
				




